१६ ते १८ डिसेंबर दरम्यान देवळाली कॅम्प ( नाशिक) येथे भव्य सैन्य भरती

0
26

देवळाली कॅम्प : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क _ तर्फे _ राजेंद्र वाघ _ ( चेअरमन भारतीय मीडिया फाऊंडेशन ) _

देवळाली कॅम्प  येथील धोंडी रोडवरील ११६ भूदल वाहिनी व १२३ पैदल वाहिनी (टीए बटालियन) मध्ये दि. १६ ते १८ डिसेंम्बर दरम्यान सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. *सैनिक (जनरल ड्युटी) व ट्रेडमन पदासाठी भरती* प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती कमांडिंग ऑफिसर मेजर आकाशदिप सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धोंडीरोड जवळच्या प्रादेशिक सेनेच्या मैदानावर ऐकून ८ राज्यासह ३ केंद्रशासित प्रदेशातील सैन्य भरतीसाठी पात्र उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. महाराष्ट्र राज्यासह आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, आणि गोवा त्याचप्रमाणे दादरा नगरहवेली, दिव, दमण, लक्षद्विप, पौंडेचेरी येथील उमेदवारांना भरतीत सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. रविवार दि. १६ डिसेंम्बर रोजी महाराष्ट्रा बाहेरील (झोन ४ मधील) उमेदवार, सोमवार दि. १७ रोजी नाशिक वगळता महाराष्ट्र, *तर मंगळवार दि. १८ डिसेंम्बर रोजी केवळ नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांची भरती प्रक्रिया होईल .त्या त्या दिवशी संबंधित भागातील उमेदवारांनी देवळाली कॅम्पच्या आनंद रोडवरील क्रिडा संकुलाच्या मैदानावर सकाळी ६ वा. पूर्वी हजर राहणे गरजेचे आहे.

 

सैनिक व ट्रेडमन पदासाठी वयोमर्यादा १८ ते ४२ वर्ष, शिक्षण सामान्य सैनिकसाठी दहावी उत्तीर्ण, क्लर्क पदासाठी बारावी उत्तीर्ण, टायपिंग येणे आवश्यक, सफाईवालासाठी इयत्ता ८ वी वगळता अन्य स्वयंपाकी, बार्बर, धोबी, पदासाठी दहावीसह संबंधित कामात प्राविण्य असणे आवश्यक आहे.* उमेदवाराची उंची १६० से.मी. वजन ५० किलो, छाती न फुगवता ७७ तर न फुगवून ८२ से. मी. असावी. शारीरिक क्षमता, मैदानी चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक असेल.

सेवारत तसेच माजी सैनिक, शहिदांच्या पत्नी, त्यांचा मुलगा, दत्तक पुत्र, नसल्यास जावई, राज्य व राष्ट्रीय खेळाडू यांच्यासाठी पात्रतेत काही सूट दिली जाणार आहे. पात्र झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी,  कागदपत्रांची पडताळणी, तसेच लेखी परीक्षा होईल.

शरीराच्या कुठल्याही भागावर टॅटू अथवा गोंदलेले असल्यास उमेदवार अपात्र ठरेल.

इच्छुक उमेदवारांनी वेळापत्रकानुसार सर्व शैक्षणिक व इतर मूळ प्रमाणपत्र आणि नक्कल प्रतिसह २० पासपोर्ट साईज छायाचित्र घेवून भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here