नियतीने खेळी केली ,”श्रध्दा “सगळ्यांना सोडून गेली

0
25

” श्रध्दा ” भावपुर्ण श्रध्दांजली ….. ,” क स मा दे टाइम्स ( साप्ताहिक )  आणि महाराष्ट्र न्यूज ” परिवार ,

परखड, दमदार, निर्णायक, महाराष्ट्रातील जनतेचे हक्काचे प्रत्येक घरा घरात व घरातील प्रत्येकाच्या मन पसंतीस उतरलेले प्रगतीचे एक निर्भिड ” फास्ट”  ” महाराष्ट्र न्यूज ” वेब चॅनल साठी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क करा.तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा ,संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक, महाराष्ट्र न्यूज : 9158417131 

महाराष्ट्र न्यूज : मालेगाव _ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील प्रभाग क्रमांक ९ चे माजी नगरसेवक कैलास येशिकर यांची कन्या कै. श्रद्धा हिचे काल रात्री दुःखद निधन झाले.त्यामुळे संपूर्ण मालेगाव शहरात शोक व्यक्त केला जात आहे. श्रध्दा मनमिळाऊ व हसऱ्या स्वभावाची होती.तिचे रात्री अचानक निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वर मात करून कैलास येशिकर यांनी शिवसेना पक्षातर्फे गेल्या पंचवार्षिक ला अटीतटीच्या निवडणुकीत मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक जिंकून नगरसेवक पद पटकावले होते. नगरसेवक कधी असताना त्यांनी व त्यांच्या पत्नी यांनी कायम जनमानसात राहून जनतेची विकास कामे केली त्यामुळे जनतेत त्यांचा दांडगा संपर्क आहे. नगरसेवक पदी राहुन जन विकासाची कामे करीत असताना आपली कन्या श्रद्धा तिची आज अचानक तब्येत बिघडल्याने नाशिक जिल्ह्यात सर्वत्र विलाज करून तब्येतीत सुधारणा होत नसल्याने कैलास येशिकर व पत्नी नगरसेविका यांनी मुलीस पुढील उपचारार्थ चेन्नई येथे घेऊन जाण्याचे निश्चित केले आणि नामदार दादासाहेब भुसे यांच्या सल्ल्याने चेन्नई येथील हॉस्पिटलमध्ये श्रद्धा स दाखल केले. गेल्याच वर्षी श्रद्धा चे हृदय व फुफ्फुस यांचे प्रत्यारोपण केले. सलग १४ महिने श्रद्धा चे आई आणि वडील चेन्नई येथे होते. श्रद्धा संपूर्णपणे बरे वाटू लागल्यावर चेन्नईहून थेट मालेगावी गेल्यावर्षी घरी आणले. सर्वत्र व्यवस्थित चालू असताना रात्री अचानक श्रद्धा सगळ्यांना कायमची सोडून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here