2020 मध्ये झालेल्या महाराष्ट्रातील अतिृष्टी करिता केंद्र सरकारने मंजूर केले ७०० कोटी

0
15

परखड, दमदार, निर्णायक महाराष्ट्रातील जनतेचे हक्काचे प्रत्येक घरा घरात व घरातील प्रत्येकाच्या मन पसंतीस उतरलेले प्रगतीचे एक निर्भिड फास्ट महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क करा.तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा.संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक , महाराष्ट्र न्यूज : 9158417131

 

महाराष्ट्र न्यूज _ मुंबई _ जगदीश का. काशिकर, _

 

 

महाराष्ट्रात २०२० साली अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले होते, त्याबद्दल केंद्र सरकारच्यावतीने ७०० कोटींची मदत मंजूर केली असल्याचे काल जाहीर करण्यात आले. २०२० च्या अतिवृष्टीत नुकसान झाले होते, त्यासाठी राज्याने केंद्राकडे ३ हजार ७०० कोटींची मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी केल्यानंतर ७०० कोटींची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मदत आणि यावर्षी महाराष्ट्रात आलेला पूर यांचा दुरान्वयानेही संबंध नसल्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सांगितले.

 

यावर्षी पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज सध्या राज्य सरकार घेत आहे. सर्व पाहणी झाल्यानंतर राज्य सरकार एकूण नुकसानीचा आकडा ठरवेल आणि केंद्राकडे त्यानुसार मदत मागेल. तसेच केंद्र सरकारचे पथक जर आताच पाहणी करण्यासाठी येत असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करु. गुजरातमध्ये केंद्राने नुकतीच एक हजार कोटींची मदत दिलेली आहे. त्यानुसार जर महाराष्ट्रालाही मदत केली तर चांगलेच होईल, असेही अजितदादा म्हणाले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here