आरोग्य सेवक महेश सुर्यवंशी ठरले कोरोना योद्धा ग्रामस्थांनी केला कौतुकाचा वर्षाव

0
28

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्या साठी संपर्क करा. संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक ,महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131

महाराष्ट्र न्यूज ,प्रशांत गीरासे , वासोळ _ देवळा तालुक्यातील वासोळ येथील प्रा.आरोग्य उपकेंद्र मधील आरोग्य सेवक महेश सुर्यवंशी आणि आरोग्य सेविका वंदना बच्छाव यांनी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता गावातील रुग्णांना उत्कृष्ट सेवा देऊन कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यात देवदूत ठरलेत.त्यामुळे बच्छाव आणि सुर्यवंशी यांचा गावात चर्चेचा विषय ठरला असून गावकऱ्यांनी दोघांचे कौतुक केले आहे.तर महाराष्ट्र न्यूजचे प्रशांत गिरासे यांनी त्यांचे अभिनंदन केले तर अहोरात्र सेवा देऊन प्राण वाचविण्यात यशस्वी ठरलेले दोघंही आरोग्य सेवकांचे कौतुक केले आहे. वंदना बच्छाव घ्या हेड कॉटर ला राहुन रात्री- अपरात्री सेवा देत असतात त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here