ओझर (मिग)नाशिक विमानतळास पद्मश्री कर्म. दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची रिपब्लिकन पक्ष संघटनांच्या विविध प्रमुख नेत्यांकडून एकमुखी मागणी

0
17

( दलीत चळवळीतील झुंजार नेतृत्व युगपुरुष पद्मश्री कर्म.दादासाहेब गायकवाड )

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिरात महाराष्ट्रभर पोहोचविण्यासाठी तात्काळ संपर्क करा…. संपर्क _ भारत पवार , मुख्य संपादक ,क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131

नाशिक _ महाराष्ट्र न्यूज साठी भारत पवार /दिनेशअहिरे _( देवळा ) _ नाशिक जिल्ह्यातील ओझर ( मिग) येथील एच ए एल कंपनी स्थापन करण्यात दलीत चळवळीतील झुंजार नेतृत्व युगपुरुष पद्मश्री कर्म.खा.दादासाहेब भाऊराव गायकवाड यांचा खारीचा वाटा असून आज एच. ए .एल. कंपनी गोल्डन जुबली ठरली आहे.ह्या कंपनीने आपल्या भारत देशातच काय संपूर्ण जगात नाव लौकिक मिळविला. त्याकाळी पद्मश्री कर्म. दादासाहेब गायकवाड यांनी पुढाकार घेऊन ही कंपनी नाशिक जिल्ह्यातच स्थापन होईल अशी ग्वाही देऊन हजारो एकर जमीन एच ए एल कंपनीस मिळवून दिली. अशा महान कार्य दृष्ट्या असणारे महान युगपुरुष दलित चळवळीतील झुंजार नेतृत्व पद्मश्री कर्म. खा. दादासाहेब गायकवाड अर्थात दादासाहेब भाऊराव गायकवाड यांचे नाव  नाशिक जिल्ह्यातील “ओझर ( मिग)” विमानतळास देण्याची एक मुखी मागणी रिपब्लिकन पक्ष संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी नाशिक येथील झालेल्या बैठकीत केली. बैठकीस राज्यभरातील शेकडो नेत्यांसह हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दादासाहेब गायकवाड यांचे चळवळीतील योगदान खुपच महान असून नाशिक जिल्ह्यात मिग विमान बनविण्याची एच ए एल  कंपनी स्थापनेसाठी तसेच अनेकविध समाजासाठी महान कार्य करणारे म्हणजेच युगपुरुष दादासाहेब गायकवाड हेच अग्रस्थानी असून यांच्या कार्याची दखल केंद्र सरकार व राज्य सरकारने घेऊन नाशिक जवळील “ओझर मिग ” विमानतळास शक्य तितक्या लवकर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यासाठी लवकरच केंद्र सरकार व राज्य सरकार यांची  भेट घेऊन नाव देण्यासाठी आग्रही करणार असे नासिक येथील आंबेडकर नगर रमाबाई आंबेडकर सभागृह येथे नुकत्याच झालेल्या  बैठकीत समस्त नेत्यांनी सांगितले. बैठकीसाठी तानसेन नन्नावरे, पवन भाऊ पवार, दिनेश भाऊ अहिरे, प्रकाश  लोंढे , रवींद्र जाधव,नानासाहेब भालेराव,मनोज संसारे,सागर गायकवाड,विलास रूपवते, राहुल डंबाळे, किशोर घाटे, संजय साबळे, विश्वनाथ काळे, भारत निकम, पुंजाराम पवार, समाधान केदारे, गबा केदारे, बॉबी पवार, कुंदन पवार आदी नेत्यांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here