धक्कादायक : माळवाडी ( देवळा) गावाचे उपसरपंच निंबा अहिरे यांचे दुःखद निधन ,गाव शोक मग्न

0
14

भारत पवार _ मुख्य संपादक / संचालक _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,आपल्या गावातील ,परिसरातील बातम्या व जाहिराती महाराष्ट्र भर प्रसिद्ध करण्या साठी संपर्क करा : मो.9158417131.                               देवळा / माळवाडी _ नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी येथील उपसरपंच निंबा फकिरा अहिरे यांचे अल्पशा आजाराने नाशिक येथील रुग्णालयात दुःखत निधन झाले.गेल्या चार दिवसापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. आजाराशी झुंज देत असताना अखेर काळाने त्यास कवटाळले आणि निंबा अहिरे यांनी झुंझ अपयशी ठरली.दोन दिवसापूर्वी च त्यांच्या मातोश्रीच्या निधन झाले असताना निंबा ने सुध्धा अचानक निघून जाणे म्हणजे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून येथे सर्वच सुन्न झाले आहे.माळवाडी गावी ऐका पाठोपाठ एक असे दुःखद घटना घडत असल्याने गाव शोकसागरात बुडाले असून चांगल्या गुण्या गोविंदाने राहणारे सर्व समाजाच्या नागरिकांच्या गावावर नियतीने असा फास का टाकावा ? का ह्या गावास नजर लागावी ? गावातील चांगुल पण नियतीस का मान्य नसावे ? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला असून संपूर्ण गाव हृदयाचा ठोका चुकल्या सारखे सुन्न झाले आहे. माळवाडी गावात देवळा तालुका प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाने चांगले लक्ष देऊन सर्वच नागरिकांना शासकीय सुख_सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जणे करून पुन्हा अशा वाईट घटनांना नागरिकांना सामोरे जावे लागणार नाही .याची काळजी वेळीच विभागीय महसूल आयुक्त,नासिक,जिल्हाधिकारी ,नासिक, मुख्य कार्यकारी अधिकारी ,नाशिक, आरोग्य उपसंचालक नाशिक ,जिल्हा आरोग्य अधिकारी नाशिक, प्रांताधिकारी चांदवड देवळा विभाग, तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी ,देवळा ,गट विकास अधिकारी देवळा ,तालुका आरोग्य अधिकारी देवळा आणि त्यांचे सहकारी आदीं अधिकाऱ्यांनी तातडीने माळवाडी गावी लक्ष देऊन गावास  चांगल्या आणि सुधारित अर्जदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास गाव कायमचे आजार मुक्त करून ” मृत्यू मुक्त ” करावे आणि ज्या नागरिकांचे मृत्यू झाले आहेत अशा वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची भरीव मदत महाराष्ट्र शासनाकडून मिळवून  देऊन वारसांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी यानिमित्ताने  महाराष्ट्र न्यूज  चे मुख्य संपादक संचालक तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे ” महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ” _ भारत पवार यांनी केली आहे. याबाबत पवार लवकरच .ना. उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री,  ना. छगन भुजबळ, पालकमंत्री,ना. दादासाहेब भुसे , कृषी मंत्री आणि विभागीय महसूल आयुक्त,, नासिक,,जिल्हाधिकारी  ,नासिक यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे यावेळी सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here