कर्जत च्या एन. डी. स्टुडिओ ला लागली आग ,मोठे नुकसान

0
17

नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी_कर्जत:खालापूर हातणोली-चौक येथील नितीन देसाई यांच्या एन.डी. स्टुडिओत आज दुपारी आग लागली आहे. ‘जोधा अकबर’ सेटजवळील फायबर मूर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे ही आग लागली असून आग विझविण्या च्या प्रयत्नांना मोठ्या कसरती नंतर यश आले याबाबत मिळालेली माहिती अशी की ,

कर्जत खालापूर येथे नितीन देसाई यांचा मालकीचा स्टुडिओ या स्टुडिओ मध्ये ऐतिहासिक मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण होते त्या स्टुडिओला आज दुपारी बारा ते सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास पाठीमागच्या बाजूने स्टुडिओला आग लागली आहे. ही आग इतकी प्रचंड होती की आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोळ संपुर्ण परिसरात दूरवर पहायला मिळत होते. एनडी स्टुडिओतील जोधा अकबर सेटजवळील फायबर मूर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे ही आग लागली . घटनास्थळी तहसिलदार इरेश चप्पलवार, पोलीस निरीक्षक विभूते व संबंधित यंत्रणा दाखल झाले , फायर ब्रिगेडच्या ३ गाड्या बोलाविल्या होत्या त्यांच्या माध्यमातून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करून आग विझवण्यात यश आले. या आगीत जीवितहानी झालेली नसून दरम्यान, या आगीत स्टुडिओचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. येथील जोधा अकबर शनिवारवाडा हे सेट आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत.

मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली ? याचे कारण अद्याप समजलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here