
भारत पवार मुख्य संपादक/ संचालक कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,9158417131 नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ राजू केदार _
महाराष्ट्र शासनाकडुन कोव्हीड-19 चा प्रदुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चैनचे आदेश पारीत करण्यात आलेले असुन, लावण्यात आलेल्या कठोर निर्बधित काळात गरीब व गरजु लोकांना हाताला काम नसल्याने गरजवंत लोकांना अन्न – धान्य, जिवनावश्यक वस्तु यांचे वाटप नवी मुंबई पोलीसांकडुन सेवाभावी स्वंस्थाच्या मदतीने सातत्याने करण्यात येत आहे.
असाच उपक्रम सीबीडी पोलीस ठाणे यांनी हाती घेतला असून सीबीडी पोलीस ठाणे हद्दीतील टाटानगर झोपडपट्टी, से.10, येथील 250 कूटुंबियांना सीबीडी पोलीस ठाणे यांचेवतीने अन्न धान्य वाटप करण्यात आले. हा उपकम पोलीस उप आयुक्त, परि-1, वाशी, सुरेश मेंगडे, सहा. पोलीस आयुकत तुर्भे विभाग भरत गाडे, यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली तसेच सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे कॉन्टीनेन्टल वेअर हाऊसचे अनिमेश विश्वास यांच्या सहकार्याने पार पाडण्यात आला.
