कलाशिक्षक भारत पवार यांच्या कलेन देवळा तालुक्यात नावलौकिक मिळविला , निर्वाण फाउंडेशन तर्फे इंटरनॅशनल आयडॉल पुरस्कार जाहीर झाला
1 min read
भारत पवार _ मुख्य संपादक / संचालक _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,9158417131. देवळा _ गुढीपाडवा व महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देवळा एज्युकेशन सोसायटीचे कलाशिक्षक भारत पवार यांनी खडूच्या साहाय्याने देवळा महाविद्यालयाच्या दर्शनी फलकावर चित्र काढून शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे म्हणून मास्क वापरा सुरक्षित रहा, कोरोना लसीकरण करून घ्या.असा संदेश ही यानिमित्ताने फलकावर देऊन जनजागृती करण्यात आली.कलाशिक्षक भारत पवार यांना निर्वाण फाउंडेशन यांच्या वतीने इंटरनॅशनल आयडॉल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.देवळा तालुक्याच्या नावलौकिकात नक्कीच भर पडली आहे.त्यानिमित्ताने देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राचार्य हितेंद्र आहेर,सचिव गंगाधर मामा शिरसाठ,गटशिक्षणाधिकारी श्री. सतीश बच्छाव साहेब,केंद्रप्रमुख श्री. रावबा मोरे, मुख्याध्यापिका सौ.रंजना मोरे,मुख्याध्यापक श्री.डी.ई.आहेर,श्री. ठोके एस.टी.,श्री.अनिल आहेर व सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षेकेतर कर्मचारी यांच्या वतीने व परिसरातील सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
