बम्बई में अजब में गहजब हो गया : प्रशासन गाफिल हो गया, आकृती हब टाऊन ऑफिस गायब ?

0
28

भारत पवार , मुख्य संपादक / संचालक _  क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : 9158417131.                 * हब टाऊन ऑफिस गायब.(?)
प्रकल्पग्रस्ता सह एम.आय.डी.सी. प्रशासन गाफील.

मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ (प्रतिनिधी) झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत चालत असलेल्या प्रकल्पाचे आकृती/हब टाऊन साईड ऑफिस गायब असून प्रकल्पग्रस्त आणि एमआयडीसी प्रशासन गाफील झाले आहे.*

डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर व कॅ. श्रावण गायकवाड यांनी विकासक साईट ऑफिस विषयी एमआयडीसी प्रशासनाला तक्रार केली असून या भोंगळ कारभारविरुद्ध आवाज उठविला आहे.

मागील दोन ते तीन वर्षांपासून विकासकाचे साईट ऑफिस बंद असून झोपडीधारकांच्या दैनंदिन तक्रारी अडचणी व अत्यावश्यक गरजा ऐकून घेण्यासाठी व सोडवण्यासाठी प्रकल्पातील बाबींचा पाठपुरावा होण्यासाठी साईट ऑफिसच पाहिजे असते मात्र या परिसरात ते नाही आहे.

असेही समजते की सदर प्रश्नावर एमआयडीसी अधिकाऱ्यांनी विचारले असता आकृती ट्रेंड सेंटर मध्ये तर अनेक्स बिल्डिंग मध्ये साईट ऑफिस असल्याचे कळवले मात्र एमआयडीसी च्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तेंव्हा साईट ऑफिस नसल्याचे निष्पन्न झाले.

विकासक विमल शहा हा फार मोठा फसवणूक करणारा गुन्हेगार असून शासन, प्रशासन व जनतेची निव्वळ फसवणूक करून अमाप संपत्ती कमवली असल्याचे दिसुन येते.

एमआयडीसी ची अधिकाऱ्या मार्फतिने विकासक विमल शहा वर खोटारडे पणा व फसवणूक केल्याप्रकरणी कलम ४२० भांडवी प्रमाणे गुन्हा नोंदवावा व प्रकल्पातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत उदभवणार्या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी तात्काळ साईट ऑफिस उघडण्याचे निर्देश द्यावेत अन्यथा लवकरच आंदोलन उभारणार असल्याचे मत डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here