वरिष्ठांन मार्फत चौकशी करूनॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करणार ,आरोपींना दोन दिवसात अटक करणार _ पो.नी. देशमुख यांचे आश्वासन
1 min read
भारत पवार मुख्य संपादक / संचालक_क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज , मो.9158417131

वासोळ : दि.3१.क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ वासोळ ता.देवळा येथील आदिवासी बांधवांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा ३१ मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दि.२४ मार्च रोजी वासोळ ग्रामस्थ, प्रहार संघटना आणि भारतीय मानवाधिकार परिषद यांच्या वतीने देवळा पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना देण्यात आले होते.
महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ऍक्ट नुसार अद्याप गुन्हे दाखल न झाल्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार रास्ता रोको आंदोलनाच्या तयारीत आलेल्या आदिवासी बांधव,वासोळं ग्रामस्थ,प्रहार संघटना व मानवाधिकार परिषदेच्या कार्यकर्त्यांना देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी लेखी स्वरूपात आश्वासन देत संबंधित वीज वितरण कंपनीतील अभियंता गांगुर्डे ,वायरमन नितीन पवार , गोरख निकम यांची वरिष्ठांमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर ॲट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले तसेच दि.१६ मार्च रोजी वायरमन नितीन पवार ,गोरख निकम यांच्यावर कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार आदिवासी बांधवांनकडून पोलीस निरीक्षक यांच्या कडे मागणी करण्यात आली होती की सदर आरोपींवर ३२४ कलम अनव्ये गुन्हा दाखल झाला परंतु अद्याप अटक का करण्यात आली नाही ,तेव्हा देवळा पोलीस निरीक्षक यांनी आदिवासी बांधवांची समजूत काढत येत्या दोन दिवसांत अटक करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कृष्णा जाधव, वाल्मिक केदारे, दादा मोरे सरपंच भऊर, किशोर आहेर भाजपा युवामोर्चा ता.अध्यक्ष शिवाजी सोनवणे मानव अधिकार परिषद जि. अध्यक्ष, सोपान सोनवणे,जगदिश निकम पत्रकार, अनिल सोनवणे एकलव्य भिल्ल संघटना जिल्हा अध्यक्ष, राजेंद्र गोधडे, मा.सरपंच, ज्ञानेश्वर पवार, भरत आहिरे, संदिप आहिरे, दिपक वाघ, पांडुरंग निकम एकलव्य शहर अध्यक्ष कळवण, राहुल पगार तसेच आदिवासी महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————————–
प्रतिकिया-
आदिवासी किंवा ईतर समाजातील गोरगरीब जनतेवर जर कोणी शासकीय अधिकारी खोटे गुन्हे दाखल करत असतील त्यांना प्रहार स्टाईल ने उत्तर देण्यात येईल
-कृष्णा जाधव प्रहार संघटना जिल्हाउपाध्यक्ष
———————————–
आदिवासी बांधवांवर कलम ३५३ नुसार जे जाचक खोटे गुन्हे दाखल झाले आहेत ते त्वरित मागे घेण्यात यावे आणि सदर वीज कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी.
-वाल्मिक केदारे भारतीय मानवाधिकार परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष