शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी संपन्न
1 min read
भारत पवार संपादक / संचालक _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज , मो.9158417131. मुंबई : दि.३१.क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ शोभा बल्लाळ , (उपसंपादक ) _ यांचे कडून _ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पोटात दुखूू लागल्याने ब्रिज कॅंडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांच्यावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून यावेळी .सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , आरोग्य मंत्री राजेश टोपे, अा. रोहित पवारही हजर होते.
शस्त्रक्रिया व्यवस्तीथ पार पडल्यावर राजेश टोपे यांनी त्याबद्दलची माहिती मीडियाला दिली.शस्त्रक्रियेनंतर साहेबांची प्रकृती चांगली आहे.त्यांच्या पित्तशयातून स्टोन यशवीरित्या काढण्यात आला आहे.
ब्रिज कँडी रुग्णालयातील सर्व ड्रॉक्टर आणि सपोर्टिंग स्ट।फ यांचे मनापासून आभार उपस्थितांनी मानले. शरद पवार साहेबांचं रोजच सकाळीआवडत काम आणि ते म्हणजे वर्तमानपत्र वाचन करीत असतानाची ही प्रसन्न चेहरा छायाचित्रात दिसत आहे .
यावेळी ब्रीच कँडीचे ड्रॉक्टर अमित यांनी माध्यमांशी बोलताना अशी माहिती दिली की काही चाचण्या केल्यानंतर आम्हाला थोडीशी गुंतागुंत असल्याचं जाणवलं त्यामुळे आज शरद पवार साहेब याच्यावर शस्त्रकीया करण्याचा निर्णय घेतला.त्यांचे पित्ताशय काढून टाकायचं की नाही याबाबत आमी नंतर निर्णय घेऊ.सध्या ते ड्रॉक्टराच्या देखरेखीखाली आहेत.
रविवारी शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना तातडीने ब्रिज कॅंडी रुग्णालय दाखल करण्यात येऊन डॉक्टरांनी लागलीच चाचण्याा केल्य पित्ताशयाचा त्रास असल्याचेेे निदान करण्यात आले होते. दरम्यान पवार यांचेे सगळे कार्यक्रम रद्द करण्यायात आले. पश्चिम बंगाल आणि केरळ येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकी साठी प्रचारार्थ पवार साहेब दौऱ्यााावर जाणार होते.
