जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाचा आंधळा कारभार चव्हाट्यावर कोरोना रुग्णाचा गुदमरून मृत्यू ! तब्बल साडे चार तासानंतर प्रशासनाला जाग ..वाचा सविस्तर …

0
24

औरंगाबाद जिल्हा रुग्णालयाची भव्य प्रशासकीय इमारत

भारत पवार संपादक / संचालक क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मो. 9158417131_ औरंगाबाद _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _औरंगाबाद जिल्हाा रुग्णालयातील कोरोना रुग्णाचा रुग्णालयातील शौचालयात गुदमरून मृत्यू*

➡️तब्बल साडेचार तासानंतर रुग्णालय प्रशासनाला जाग.

💁🏼‍♂️औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात एका कोरोना बाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे गुलाबराव ढवळे असे रुग्णाचे नाव असून हा रुग्ण तब्बल साडेचार तास ऑक्सिजन विना शौचालयांमध्ये पडून होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

➡️ रात्रीच्या सुमारास शौचालयात गेलेला हा रुग्ण चक्कर येऊन शौचालयात पडला त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांच्याकडे कुठलेही लक्ष दिले नाही तब्बल साडेचार तास रुग्ण परत न आल्यामुळे इतर रुग्णांनी तक्रार केल्यानंतर स्वच्छालयात जाऊन तपास केला असता स्वच्छालय चे दार बंद होतं त्यानंतर दरवाजा तोडून पाहिलं असता रुग्ण हा बेशुद्धावस्थेत पडल्याचे समोर आले त्यानंतर रुग्णाला तपासला असता त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं शौचालयात जाऊन मृत्यू झाल्यानंतर तब्बल साडेचार तास जिल्हा रुग्णालयाने या रुग्णाकडे लक्ष न दिल्यामुळे औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयातील आंधळ्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here