ओझर एच .ए. एल.कामगार संघटने च्या पदाधिकार्यांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची भेट, कोरोना महामारी प्रतिबंधात्मक लस प्रत्येक कामगारांना उपलब्ध करून देणार आरोग्य मंत्र्यांची ग्वाही
1 min read
भारत पवार ,

ओझर टाऊनशिप _ क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ प्रतिनिधी _ कोरोना महामारी तून सुटका करण्यासाठी तसेच कामगारांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी एच ए एल ओझर टाऊनशिप नाशिक विभाग येथील एचएएल हॉस्पिटल स्टॉप सह सर्व कर्मचाऱ्यांना करोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही राज्याचे आरोग्य मंत्री राजेश जी टोपी यांनी दिली.
सर्व एचएएल कामगार बांधवाना कोरोना महामारी प्रतिबंधात्मक लस देण्याविषयी बुधवारी १७/३/२१ रोजी राज्याचे आरोग्यमंत्री मा.राजेशजी टोपे यांची मा.आमदार श्री अनिल आण्णा कदम यांच्या माध्यमातून भेट घेऊन चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यातील संरक्षण खात्याचा महत्वाचा उपक्रम आणि देशभरात वायुसेनेला सेवा देणाऱ्या एचएएल कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना अत्यावश्यक सेवा विभागाप्रमाणे कोरोना प्रतिबंधात्मक लस पुरवठा प्राधान्यक्रमाने करावा अशी मागणी यावेळी झालेल्या चर्चेत करण्यात आली.
मा.आरोग्यमंत्री महोदयांनी आपल्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर लस पुरवठा करण्यासंबधी सूचना आरोग्य विभागाचे उपसचिव यांना दिल्या आहेत.
दिनांक १५/०३/२१ पासून जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त होणाऱ्या लस टप्प्याटप्याने देण्यास आपल्या हॉस्पिटल मध्ये सुरुवात करण्यात आली आहे.
*फ्रंट लाईन वॉरियर्स चा सेकंड डोस देखील देण्यात येत आहे.
उर्वरित आपल्या कामगार बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी यासाठी संघटना प्रयत्नशील आहे .
* आपल्या बातम्या आणि जाहिराती महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक घराघरात तसेच शासना पर्यंत पोहोचण्यासाठी तात्काळ संपर्क करा . तसेच नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येक महानगरात आणि ओझर व ओझर टाऊनशिप येथे पत्रकार नियुक्त करणे आहेत , संपर्क : भारत पवार ,संपादक /संचालक, ” महाराष्ट्र न्यूज ” मो.9158417131