June 27, 2022

नवी मुंबई महापालिकेत शिजते टक्केवारी चे राजकारण मनसे ने केले आपले उग्र रूप धारण,टक्केवारी घेणाऱ्यांचे केले वस्त्र हरण …!

1 min read

 

नवी मुंबई : क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज “_ खास प्रतिनिधी _ दिवसापूर्वी एका प्रमुख वृत्तपत्रामध्ये कोपर खैरणेतील काही नगरसेवकांनी प्रभागा मध्ये होत असलेल्या नागरी कामांमध्ये कंत्राटदाराकडून टक्केवारीची मागणी केली होती. महानगरपालिकेच्या नागरी कामांमध्ये अशी टक्केवारी दिली जाते अशी दबक्या आवाजात चर्चा होत असतांना अशा प्रकारची बातमी प्रमुख वृत्तपत्र देत असेल; तर त्याची दखल महानगरपालिकेने, पोलीस प्रशासनाने, राज्य सरकारने, लाचलुचपत प्रतिबंध विभागाने घेणे आवश्यक होते. पण अशा प्रकारची कोणतीही दखल घेतली असल्याचे दिसून आले नाही. या संपूर्ण टक्केवारीच्या राजकारणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

नगरसेवक, कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांच्या माध्यमातून हे कथित टक्केवारीचे राजकारण नवी मुंबईत सुरु आहे. असा आरोप शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला. या टक्केवारीमुळे कंत्राटदार जास्त दराने कंत्राट घेतात आणि निकृष्ट दर्जाची नागरी विकासकामे नवी मुंबईकरांच्या माथी मारतात. अशा टक्केवारीमुळे नवी मुंबईची प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे. नाशिक मध्ये मनसेने विविध कंपन्यांकडून यांचा व्यावसायिक सामाजिक जबाबदारीसाठी राखीव असलेल्या निधीतून
(सी. एस. आर फंड) शेकडो करोडची कामे आपल्या कार्यकाळात केली. अशा कामात कोणतीही टक्केवारी मिळत नाही. नवी मुंबईत ३५०० हुन जास्त कंपन्या असताना अशी कामे मुद्दाम केली जात नाहीत, असा स्पष्ट आरोप शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केला.

या टक्केवारीच्या राजकारणासंदर्भात मनसेने प्रमुख तीन मागण्या केल्या आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची महानगरपालिका, लाचलुचपत प्रतिबंध विभाग यांनी सखोल चौकशी करावी.,
दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा ,
दोषी नगरसेवकांना निवडणूक लढवण्यास निवडणूक आयोगाने प्रतिबंध करावा.

मनसेच्या या पत्रकार परिषदेत उप शहरअध्यक्ष प्रसाद घोरपडे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव अभिजित देसाई, अमोल इंगोले, शरद दिघे, पालिका कामगार सेना शहरअध्यक्ष अप्पासाहेब कौठुळे, मनविसे शहरअध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगार शहरअध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, शारीरिक सेना शहरअध्यक्ष सागर नाईकरे, विभागअध्यक्ष अमोल आयवले उपस्थित होते.

महत्वाचे : *नवी मुंबई ,ठाणे,कल्याण,भिवंडी व अन्य ठिकाणच्या महानगर पालिका,नगर पालिका,नगर पंचायत निवडणुकीत उमेदवारी करू इच्छिणारे उमेदवारांनी आपल्या फोटो सह मुलाखत “महाराष्ट्र न्यूज “कडे पाठवावी अल्प दरात प्रसिध्द करून” “कमी वेळात ,जास्त लोकांपर्यंत,मतदार “पर्यंत पोहचणार म्हणजे मतदान आपले हककाचे होणार ,म्हणून त्वरित संपर्क करा आणि आपले कर्तृत्व सिद्ध करा.तसेच “महाराष्ट्र न्यूज “साठी पत्रकार आणि संपादकांच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात येत आहे तसेच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या साठी त्वरित संपर्क साधावा _ संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक , महाराष्ट्र न्यूज मो.9158417131 , राजू केदारे , प्रतिनिधी, नवी मुंबई _मो.9594953810

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.