घाणेगाव सरपंचपदी शोभा चोपडे तर उपसरपंचपदी रामसिंग करचवार यांची निवड , गाव विकासाला प्राधान्य देणार _सरपंच ,चोपडे

0
23

मालेगाव _ क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज ” _ वनिता सोनवणे यांचे कडून _ मालेगाव तालक्यातील घाणेगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शोभा लक्ष्मण चोपडे यांची नियुक्ती झाली असून उपसरपंचपदी राम सिंग कोमल सिंग करचवार यांची नियुक्ती करण्यात आल्याने गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर सरपंच ,उपसरपंच आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचे गावकर्यां तर्फे स्वागत करण्यात आले . यावेळी स्वागताला उत्तर देताना विकासाला आपण प्राधान्य देणार असून नागरिकांनी आपणास सहकार्य करावे असे भावनिक आवाहन सरपंच शोभा चोपडे यांनी यावेळी केले तर शासनाच्या विविध शासकीय योजना आपण जनतेसाठी राबविणार असून यासाठी सरपंच शोभा चोपडे आणि मी स्वतः वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे उपसरपंच राम सिंग कोमल सिंग करचवार यांनी यावेळी सांगितले.

पाहिजेत _ महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्‍यात तसेच गावागावात पत्रकार व संपादक विभागाच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात येत आहे, पत्रकारितेत आपले नाव उज्ज्वल करण्यासाठी जनतेत संपर्क असणाऱ्यांनी  व लिखाणाची आवड असणार्‍यांनी तात्काळ संपर्क करावा. तसेच आपल्या परिसरातील गावातील ताज्या घडामोडी व अन्य बातम्यांसाठी आणि कुठल्याही प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क करावा .आपली जाहिरात महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी घराघरात पोहोचण्याचे वेब पोर्टल चैनल कसमादे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज”संपर्क _भारत पवार, मुख्य संपादक ,महाराष्ट्र न्यूज मो.9158417131,आणि वनिता सोनवणे, पत्रकार मालेगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here