वाघाड परिसरात बिबट्याचा धुमाकूळ ,नागरिकांत भीतीचे सावट ,पिंजरा लावण्याची फॉरेस्ट कडे मागणी

0
29

 

 

*वासोळ : क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” ची मोठ्ठी बातमी _ नाशिक जिल्ह्यातील –

दिंडोरी तालुक्यातील वाघाड व परिसरातील शिंगाडे वस्ती येथे बिबट्याने अनेक दिवसापासून दहशत निर्माण केल्याने शेतकरी बिबट्याच्या सावटाखाली जीवन जगत आहे.यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.
दिंडोरी तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याचे दर्शन होत आहे.तसेच तालुक्यातील वाघाड परिसरातील कोकणगाव रस्त्यालगत असलेल्या शिंगाडे वस्ती येथे सायंकाळच्या सुमारास गेल्या अनेक दिवसापासून बिबट्या रात्री- दिवसा दर्शन देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.तसेच या बिबट्याकडून कोंबड्या, कुत्रे फस्त करण्याचा सपाटा सुरू असल्याने रात्रीच्या सुमारास येथील ग्रामस्थांना जागता पहारा देण्याची वेळ आली आहे.या बिबट्यापासून मानवहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे.बिबट्याचा पिंजरा लावून बंदोबस्त करावा अशी मागणी रतन शिंगाडे, नामदेव शिंगाडे,मनोहर शिंगाडे,मुरलीधर गांगोडे,सोमनाथ गांगोडे,मोतीराम माळेकर,दत्तू शिंगाडे आदींसह शेतकरी,ग्रामस्थांनी केली आहे.

* टिप_ महाराष्ट्रातील घराघरातील वाचकांच्या मनामनात ठाण मांडून घराघरात पोहोचलेले राज्यातील समस्त वाचकांनी पसंत केलेल्या कसमादे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज ” साठी बातम्या ,जाहिराती साठी संपर्क करावा, तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्यातील गावागावात पत्रकार तसेच संपादकांच्या विविध पदांवर नियुक्ती करणे आहेत जनसंपर्क भरपूर असणाऱ्यांनीच व लिखाणाची आवड असणाऱ्यांनी तात्काळ संपर्क करावा.* आकर्षक कमिशन दिले जाईल *संपर्क _भारत पवार, मुख्य संपादक “महाराष्ट्र न्यूज “,मो.9158417131.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here