तळवाडे_ देवळाणे रस्ता : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा विरूध्द शेतकऱ्याने ” मेरी मर्जी केली रस्त्यावरच बेकायदेशीर मंदिर उभारणी केली , त्या वस्ताद वरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली तर रस्त्याचे डांबरीकरण अर्धवटच …

0
68

मालेगाव _ क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “_ प्रतिनिधी _ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तळवाडे ते देवलाने रस्त्याची चालवली दशा,संबंधित उच्चपदस्थ अधिकारी ही दशा थांवण्यासाठी आपले सदकर्तव्य सत्कारणी लाऊन पूर्ण करतील का नागरिकांच्या अपेक्षा ? असा सवाल केला जात आहे .तर कोंडाजी पर्वत कुंवर यांनी याबाबत मुख्य न्यायमूर्ती,नाशिक, जिल्हाधिकारी , नासिक ,जिल्हा पोलीप्रमुख,नासिक , उपविभागीय पोलिस अधिकारी,मालेगाव ग्रामीण ,उपअभियंता सा.बा.विभाग , पं.स.मालेगाव यांचे कडे तक्रार अर्ज करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत समजलेली हकिकत अशी की मालेगाव तालुक्यातील तळवाडे व देवलाने येथील  रहदारीचा रस्ता जी.प.नासिक अंतर्गत आहे. सदरच्या रस्त्याचे देखभालीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती मालेगाव येथील अधिकारी वर्गाचे असून सदरचे अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे दिसते आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी याचेच भान अधिकारी नेमके विसरतात असेच म्हणता येईल असे सदरच्या बेकायदेशीर व न्यायालयाचा आदेश डावलून  अतिक्रमण केलेल्या मंदिर उभारणी च्या कामा वरून सांगता येईल. तळवाडे ते देवलाणे रस्त्या च्या  गट न.953 च्या पूर्वेस जी.प.रस्त्याच्या हद्दीत तळवाडे येथील ” बहादुर ” शेतकऱ्याने चक्क सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून “चलेगी मेरी मर्जी “याप्रमाणे ” म्हसोबा “मंदिर बांधकाम केले.सर्वोच्च न्यायालयाने स.न.2009 मधील आदेश सांगतो की अतिक्रमण मध्ये असलेले कोणत्याही देवाचे मंदिर असो की मस्जिद असो ती पाडण्याचा आदेश करून यापुढे अतिक्रमण मध्ये कोणतेही मंदिर बांधकाम केले जाऊ नये असा आदेश असताना सुद्धा मंदिराची उभारणी केली गेली.तेही कुणाचीही पूर्व परवानगी  घेता.त्यामुळे सदर बांधकाम करणाऱ्या इसमा विरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कोंडाजी पर्वत कुंवर यांनी संबंधित अधिाऱ्यांकडे केली आहे.तर सदरच्या रस्त्याचे डांबरीकरण अर्धवटच करून कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाल्याचे प्रकार समोर असल्याची धक्कादायक बाब उघड झाल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे ह्या गौडबंगाल प्रकारचा शोध आणि बोध होण्याचे गरजेचे झाले आहे.याबाबत चा प्रकार नेमका काय आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती मालेगाव यांनी कसा पचवला ? हे लवकरच आमच्या ” महाराष्ट्र न्यूज ” च्या महाराष्ट्रातील वाचकांसमोर मांडणार असून संबधित अधिकारी ग्रामपंचायत निवडणूक कामात व्यस्त असल्याने सद्या भेटू शकले नसल्याने याबाबत लवकरच सत्य उजेडात आणण्यात येईल असे सांगण्यात आले

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here