ग्रामपंचायत निवड :ठेंगोडा ( सटाणा) गावातील जनतेने अण्णासाहेब पगारे यांचे नेतृत्व मान्य केले तब्बल अकरा सदस्य बिनविरोध निवडले
1 min read
देवळा : क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज “_ प्रतिनिधी _ संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने स्थानिक राजकारण म्हणून ह्या निवडणुकीस आमदार , खासदार निवडणुकीपेक्षा खूपच महत्व प्राप्त झालेले असते.त्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी उद्या पासून खूपच जोरात असणार हे आपणास पहावयास नक्कीच मिळणार येत्या १५ जानेवारी 0 २१रोजी मतदान होणार असून मतमोजणी १८ जाने.0२१ रोजी होणार आहे. अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायतीत काट्याची जबरदस्त टक्कर होणार हे ही सत्य नाकारता येत नाही .नाशिक जिल्ह्यातील बागलाण (सटाणा ) तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत समजली जाणारी ठेंगोडा गावाची ही निवणुक कायम अटीतटीची होत असे परंतु यंदाच्या निवडणुकीत ह्या लढतीस मोठा छेद बसला आहे .कधी नव्हे तब्बल अकरा जागा चे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने गावात आदर्श निर्माण झाला आहे. ठेगोडा गावातील अण्णासाहेब ( छोटू ) पगारे यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची भूमिका घेतली आणि पत्नी चिंधाबई पगारे यांना उभे केले आणि पाहता पाहता चॅनल च उभे केले .अण्णासाहेब पगारे यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि कोणाच्या ही सुख दुखत सहभाग घेणारे असे अण्णासाहेब पगारे यांचे नेतृत्व लाभल्याने गावातील लोकांनी आणि उमेदवारांनी सुद्धा अण्णासाहेब मोरे यांचे नेतृत्व मान्य करून एक नव्हे दोन नव्हे तब्बल अकरा जागा बिनविरोध निवडून आणले हा आदर्श समस्त उमेदवारांनी आणि गावकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यात घालून दिला.आणि सरपंच मात्र अण्णासाहेब पगारे यांचा नेतृत्वाचा होणार हे निश्चित झाले आहे.त्यामुळे ठेगोडा गाव ” विकासाच्या ” दिशेने एक पाऊल पुढे असणार असेही बोलले जात आहे. बिनविरोध निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य _ चिंदाबाई अण्णासाहेब पगारे , रवींद्र आनंदा मोरे,अंजनाबाई आनंदा मोरे , अर्चना मोतीराम चौधरी ,नारायण माधव राव निकम , भरत भिला धनवटे ,लताबाई वसंत पवार, दौ लत रामदास पगार , लताबाई गोरधन शिंदे , सुनंदा गोरख सोनवणे ,सुनीता शशिकांत जाधव आदी सर्व अण्णासाहेब पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आल्याने गावात आनंद पसरला आहे.
