मालेगांवी राष्ट्र सेवा दलाच्या वतीने सावित्री उत्सव साजरा ,आज आपण महापौर केवळ सावित्रीबाईं मुळेच _ ताहेरा शेख

0
19

मालेगाव- क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज “_ प्रतिनिधी _”क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अतुलनीय योगदानामुळे महिलांना मानसन्मान मिळाला. आज आपण महापौर केवळ सावित्रीबाईंमुळेच होऊ शकले”, असे प्रतिपादन मालेगावच्या प्रथम महिला महापौर ताहेरा शेख यांनी येथे केले.
येथील राष्ट्र सेवा दलाच्या वतीने आयोजित सावित्री उत्सव प्रसंगी त्या बोलत होत्या. सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास वडगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी उपमहापौर तथा नगरसेविका अॅड ज्योती भोसले, तंत्रस्नेही शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्या वैशाली भामरे, तालुका कार्याध्यक्ष सुधीर साळुंके मंचावर उपस्थित होते. कोव्हिड-१९ काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आशा वर्कर्स तसेच आरोग्य सेविकांचा सत्कार सेवा दलाच्या वतीने करण्यात आला.
श्रीमती शेख पुढे म्हणाल्या की, कोरोना काळात आरोग्य सेविकांनी जीवावर उदार होऊन काम खूप मोठे आहे. आरोग्य सेविकाच्या कामाची दखल राष्ट्र सेवा दलाने घेतली, हे अभिनंदनीय आहे
शाहीर अशोक आण्णा फराटे गीतमंचच्या सोनल सोनवणे, ऋतुजा पाठक, ईरा फराटे, पूर्वा कुदळे, उत्तरा कुदळे, अवनी वाणी, क्षितिजा सोनार, अवंती वाणी यांनी सावित्रीच्या ओव्या सादर केल्या तर सेवा दल मंडळ सदस्य स्वाती वाणी यांनी गीत सादर केले. अतिथींचे स्वागत सेवादल दिनदर्शिका, संविधान प्रास्ताविकाआणि पुस्तक देऊन करण्यात केले.
‘सावित्री आहे घरोघरी जोतिबाचा शोध जारी’, हे घोषवाक्य केंद्रस्थानी ठेवत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंती निमित्ताने सावित्री उत्सव साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रतिमेस अतिथींच्या हस्ते खादीचा हार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविकात राज्य सचिव नचिकेत कोळपकर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख सर्व समाजाला होणे आवश्यक आहे म्हणून हा उत्सव घरोघरी साजरा करण्याचा प्रयत्न राष्ट्र सेवा दल करीत आहे. राष्ट्र सेवा दलाच्या प्रयत्नामुळे हा दिवस या वर्षी पासून शासन स्तरावर महिला शिक्षण दिन म्हणून साजरा होत आहे असे सांगितले.
महिलांनी सामाजिक कामात पुढे आले पाहिजे. वैज्ञानिक युगात आता महिलांनी अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर पडावे, हीच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना आदरांजली असेल. वटसावित्रीनिमित्ताने १०१ वटवृक्ष लावा. आपल्याला पुराणातील सावित्री न बनता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बनायचे आहे, असे नगरसेविका अॅड ज्योती भोसले यांनी सांगितले.
तसेच कल्पक शिक्षिका वैशाली भामरे यांनी मुलींसाठी भाग्यश्री शिष्यवृत्ती राष्ट्र सेवा दलाने सुरू करावी त्यासाठी आपण आर्थिक योगदान देण्याचे आश्वासन दिले. घरात मूलगा मुलगी असा भेद करू नका हे ही सांगितले.
यानिमित्ताने एकलव्य शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली असून नचिकेत कोळपकर यांनी संकल्पना स्पष्ट केली. यावेळी दर्शन साळुंखे यांस ३ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. यावेळी २८ आरोग्य सेविका आणि डॉ संदीप खैरनार यांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य सेविकांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन अनवर पठाण यांनी केले.
आमचा सत्कार करून आमच्या कामाची दखल घेतल्या बद्दल आम्ही राष्ट्र सेवा दलाचे आभार मानतो. सावित्री उत्सव निमित्ताने केलेले आमचे कौतुक आम्ही कधीच विसरणार नाही कोरोना योद्धा म्हणून आम्हाला सन्मान पत्र देऊन आम्हाला सन्मानीत केले हे आम्हाला जीवनभर प्रेरणा देत राहिल, असे आरोग्यसेविकाच्यावतीने विनया भालेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
राज्यसचिव नचिकेत कोळपकर यांनी सुत्रसंचलन केले. उत्सव समिती अध्यक्ष राजीव वडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा संघटक रविराज सोनार, सारंग पाठक, बळवंत अहिरे, अॅड मनोज चव्हाण, सुरेंद्र टिपरे, श्याम शिंपी, प्रवीण वाणी, भूषण आढावे, प्रा. अनिल महाजन, अशोक पठाडे, राजेंद्र दिघे यांनी परिश्रम घेतले.
यावेळी मामको बॅंकेचे संचालक राजेंद्र भोसले, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे, प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे, माजी उपायुक्त अशोक कापडे, जावीद अहमद, एच. एस. मंडळ, सौ. मंगला देवरे, श्रीमती ए. टी महाजन, कविता मंडळ आदींसह आरोग्य सेविकांचे कुटूंबिय उपस्थित होते.

सत्कारार्थी आरोग्य सेविका आणि आशा वर्कर्स _
उज्वला नानाजी पानसरे, विनया कमलाकर भालेकर, सुवर्णा पोपटराव कुमावत, रुथ रमेश शिंदे, स्नेहा शमुवेल आडबले, श्रीमती एलीना जाॅन मायकल, डिंपल सुनिल पाटील, मंजू समाधान तायडे, रेखा विठोबा निकम, मोनालीसा अरूण मोहन, शशिकला माणिक बच्छाव, वैशाली राजेंद बच्छाव, उज्ज्वला वंसत कचवे, विजया आशोक सुर्यवंशी, अर्चना सतिश शेवाळे, सरिता खंडू मोरे, रुपाली रमेश कोठावदे, सोनाली संजय बच्छाव, अरुणा रमेश भदाणे, दीपाली अशोक बैरागी, उषा साहेबराव खैरनार, दीपाली किरणकुमार बागुल, जयश्री जिभाऊ बागुल, भाग्यश्री जिभाऊ बागुल, शालिनी बाजीराव गांगुर्डे, रेखा राजेंद्र खैरनार, सुरेखा पांडुरंग जगताप या आरोग्य सेविका आणि डॉ संदीप खैरनार यांचा कोविड काळातील कामगिरी बद्दल सन्मान करण्यात आला.

विशेष _
कार्यक्रम प्रसंगी महात्मा जोतिबा फुले यांच्या फुले वाड्याचे फलक चित्र ‌सेल्फी पॉईंट हे आकर्षण बिंदू होते. सर्वानी फुले वाड्यात वैयक्तिक व कुटुंबियांसह सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांची वेशभूषा धारण करीत फोटोचा आनंद अनुभवला. हा सेल्फीपाॅईंट आता या. ना. जाधव विद्यालयात ठेवण्यात आला असून, मालेगावकरांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here