ग्रहण मालेगावचे : अल्पयीन मुलीशी सुत जुळविले,त्यातून त्याने नीच पणाचे धागे विणले,म्हणून तिच्या पोटात दुखु लागले आणि पोलिस त्याला शोधत फिरू लागले

0
33
 •  

  वासोळं -कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रशांत गिरासे _ घटना आहे मालेगाव च्या सना उल्ला नगर येथील अल्पवयीन मुलीची तेथील भागातील तरुणाने तिच्याशी ओळख करून प्रेम संबंध जुळविले मुलगी अल्प वयीन आणि तिला सखी आई नसल्याच्या फायदा उचलत येजाज नामक पापी हरामखोराने पापाचे सुत जुळविले आणि मुलीस धमक्या देणे सुरू करून वेळोवळी तिच्याशी पापी धाग्याचे सुत जुळवत राहिला त्यामुळे तिच्या पोटात दूखू लागल्याने आईने तिला दवाखान्यात नेले. तपासात अल्पवयीन तरुणी गर्भवती असल्याचा रिपोर्ट हातात आला. तरुणीला विचारणा केली असता तिचा अखेर संयमाचा बांध तुटलाच.

  अशी आहे घटना

  शहरातील सनाउल्लानगर भागातील पंधरावर्षीय अल्पवयीन तरुणीसोबत धक्कादायक घटना घडली. तिच्याशी सलगी व ओळख वाढवून तिला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यातून तरुणी गर्भवती राहिली. याप्रकरणी एजाज खान ऊर्फ बंटी शराफत खान (रा. सनाउल्लानगर) या तरुणाविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत सहा महिन्यांपूर्वी एजाज ऊर्फ बंटीने तिच्याशी ओळख करून सलगी वाढवली.

  त्यानंतर वेळोवेळी धमकी देत लैंगिक अत्याचार केले. संबंधित तरुणीचे पोट दुखू लागल्याने तिच्या सावत्र आईने तिला डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेले असता, मुलगी गर्भवती असल्याचे तपासणीत निष्पन्न झाल .आणि धाडसाने त्या पापी येजाज विरूद्ध गुन्हा दाखल केलाच परंतु ?

  अल्पवयीन तरुणीचा फायदा घेत केलेल्या या गुन्ह्याप्रकरणी पीडिेतेने एजाजविरुद्ध तक्रार दिली. आझादनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक दशरथ पारेकर, उपनिरीक्षक माने संशयिताचा शोध घेत फिरू लागले असे परंतू असले तरी पीडित मुलीस न्याय आता कधी मिळणार ? अशी चिंता तिच्या सावत्र आईने व्यक्त केली असून मुलीस तात्काळ योग्य न्याय दिला जावा अशी मागणी ही मुलीच्या आईने यावेळी व्यक्त केली. तर मालेगाव कायम या – ना त्या समस्यांनी चव्हाट्यावर येत असून कधी मिटणार मालेगावचे ग्रहण ? असा सवाल नागरिक करत आहेत.तर पीडित मुलीस तात्काळ योग्य न्याय देण्याचीही मागणी यावेळी कण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here