मालेगावचा वनवास संपेचना …मालेगावी आगीचे तांडव,लाखोंचा माल जळून खाक
1 min read

मालेगाव ,( नाशिक ):दि.१६ . मालेगाव शहर कायम या-ना त्या कारणाने गाजतच असते येथे कोरोनाने जनता पूर्ण पणे घाबरलेली असतांना शहरातील साठ फुटी रस्त्यावरील निताज क्रिएशन्स या शोभेच्या वस्तू, फ्रेम, व डेकोरेटिव्ह दुर्मिळ वस्तू विक्रीच्या शोरूमला आग लागली. आगीने इतके प्रचंड रूप धारण केल्याचे दिसून येत होते ज्वालाग्रही वस्तू मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीच्या ज्वाला दूरवरून स्पष्ट दिसत होत्या ,गुरूवारी (ता.15) रात्री ही आगीची घटना घडली. महापालिका अग्नीशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आगीचे निश्चित कारण व नुकसानीचा अंदाज समजू शकले नाही. मात्र शोरूम मधील किंमती व मौल्यवान वस्तू पाहता नुकसान लाखोंचे असू शकते. ज्वलनशिल वस्तू मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीच्या ज्वाला दूर अंतरावरून दिसत होत्या. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. अग्नीशामक व पोलिस दलाचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. हे शोरूम निता मुंदडा यांच्या मालकीचे आहे. सदर घटनेचा आढावा घेतला कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “चे मालेगाव प्रतिनिधी – निलेश कासार यांनी .