September 21, 2023

कळवणहुन चोरी करून परतला,पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन उचलून आणला

1 min read

 

वासोळ – कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रशांत गिरासे याज कडून –

कळवण – येथील किसान ट्रेडर्स या कृषी सेवा केंद्राच्या दुकानाचे पाठीमागील बाजूने पत्रा कापून कांदा बियाणे व रोख रक्कम चोरुन नेणाऱ्या धुळे येथील सराईत अट्टल गुन्हेगारास मुद्देमाल, रोख रक्कमसह पकडण्यात कळवण पोलिसांना यश आले आहे.
भिका सदू भोई (रा .लोंढानाला ,अकलाड – मोराणे धुळे) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात कळवण शहरातील गणेशनगर भागात कळवण देवळा रोडवरील न्यायालयासमोरील अतुल गोविंद रौंदळ यांचे मालकीचे किसान ट्रेडर्स कृषी सेवा केंद्राचे दुकानाचे पाठीमागील बाजूचा पत्रा कापून आत प्रवेश करुन घरफोडी करुन दुकानातील प्रशांत व मालाव नावाचे कांदाचे बियाणे व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली होती या बाबत कळवण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हयाचा तपास चालू असतांना पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना गुन्ह्यातील आरोपी संदर्भात माहिती मिळवून भोई याने चोरी केली असून सदरचा आरोपी हा सध्या त्याचे राहते घरी आहे .पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदशर्नाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश निकम , पोलिस हवालदार मधुकर तारु , शिवाजी शिंदे, सुरेश पवार यांच्या पथकाने लोंढानाला , अकलाड – मोराणे ता.जि. धुळे येथे लोटानाला परिसरात सापळा रचून त्याच्या राहत्या घरुन त्याला शिताफिने ताब्यात घेतले. घराची झडती घेऊन घरात रुपये ४५०० रूपय्े किमतीचे प्रशांत नावाचे लेबल असलेले कांदा बियांणांचे एक नग अंदाजे एक किलो वजनाचे सिलबंद पाकिट तसेच २२,५०० रु . किंमतीचे प्रशांत कंपनीचे सुटे बियाणे एका प्लॅस्टिकचे पिशवीत असलेले अंदाजे वजन५ किलो असा २७हजाररुपये किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.

About Author

More Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.