Home कृषी कोरोना महामारीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची देवळा तालुक्यात मागणी झाली,अन्यथा...

कोरोना महामारीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची देवळा तालुक्यात मागणी झाली,अन्यथा आंदोलन उभारण्याचा प्रहार ने ईशारा केला

0
157

वासोळ वार्ताहर-
देवळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी या मागणीचे निवेदन देवळ्याचे नायब तहसीलदार प्रशांत काथेपुरे यांना देण्यात आले. सदर निवेदन म्हटले आहे की, गतवर्षीच्या तुलनेत उमराणे , दहिवड , रामनगर , वाखारी , कापशी , भिलवाड , विठेवाडी , भऊर , वाजगांव , खर्डे , मेशी यांसह संपूर्ण देवळा तालुक्यात (सर्व गावांची नावे आपण समजून घ्याल ) यंदाच्या चालू हंगामात निर्सग राजा कोपला असुन परीणामी अतिवृष्टीमुळे कांदा , डाळिंब , मका व इतर कृषी पिके नेस्तनाबूत झालेली आहेत.आधिच कोरोना महामारीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे.थोडाबहूत शेतकरी सावरतो न सावरतो तोच निर्सगाने आपले प्रताप दाखवून धुंवाधार बरसुन शेतकरी नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला सर्वांच्या नजरेत येत आहे.बळीराजा धुंवाधार अतिवृष्टीमुळे आपल्या शेतातील कांदा,डाळिंब,मका व इतर फळ पिकांची वाताहत सुन्न नजरेने बघून हतबल तसेच नेस्तनाबूत झालेला आहे . प्रशासनाने शेतकऱ्यांची आर्त हाक ऐकून सरसगट पंचनामे करून बळीराजास आधार द्यावा.जेणेकरून गोरगरीब शेतकऱ्यांच्या चुलीतुन धुर निघेल बळीराजा सुखा समाधानाने नांदेल.आर्त हाक कृपया शासनाकडे पोहोच करा.प्रत्येकाचे बांधावर जाऊन पंचनामे करा बळीराजाला नुकसान भरपाई दिली नसता मंगळवार दि . २७/१०/२०२० रोजी सकाळी ११ वा .आम्ही संपूर्ण देवळा तालुक्यातील प्रहार पदाधिकारी व शेतकरी आपले कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू असा इशारा देखील निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.निवेदनावर प्रहारचे संघटनेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव,कार्याध्यक्ष दशरथ पूरकर,प्रहार शेतकरी संघटनेचे देवळा तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here