भारत पवार : राज्य मुख्यसंपादक : ९१५८४१७१३१ देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : शिवसेना ( शिंदे गट) संघटनेच्या तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षाचे काम करत असताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी डोकेदुखी होत होती. कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या अडचणी कायमच्या सोडविण्या साठी आपण पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मालेगाव शिवसेना पक्ष कार्यालयात जाऊन त्या कायमच्या मार्गी लावणार असे आवाहन देवानंदबापू यशवंत वाघ ( शिवसेना उपजिल्हा प्रमुख नाशिक ग्रामीण ) यांनी देवळा व पेठ तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले होते. आपला शब्द पाळत देवानंदबापू वाघ यांनी काल मालेगाव शिवसेना पक्ष कार्यालयात पेठ व देवळा तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री ना. दादासाहेब भुसे यांची भेट घेऊन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी व त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर चर्चा करून त्या मार्गी लावण्याचे काम वाघ यांनी यावेळी केले.
यावेळी देवानंदबापू वाघ यांच्या समवेत पेठ व देवळा तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






