भारत पवार : मुख्य संपादक : ९१५८४१७१३१ देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज. ऑनलाइन न्यूज चैनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : तालुक्यातील भावडे येथील एस.के.डी.इंटरनॅशनल स्कूल व व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
एस.के.डी चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संचलित,एस.के.डी. इंटरनॅशनल भावडे व व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भावडे येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी, आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे प्रथम विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. व्ही.के.डी. विद्यालयाचे प्राचार्य वाघ एन.के. यांच्या हस्ते स्काऊट गाईड ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या सेक्रेटरी मीना देवरे,यांनी राष्ट्र ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण केले. विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, झेंडा गीत व महाराष्ट्र राज्य गीत गाऊन भारतीय तिरंग्याला सलामी दिली. कार्यक्रमाप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी मीना देवरे,डॉ. सूर्यकांत पाटील, मंगेश शिंदे, एस.के.डी. विद्यालयाचे प्राचार्य एस.एन.पाटील ,व्ही.के.डी. विद्यालयाचे प्राचार्य एन.के. वाघ ,वरुण देवरे ,बबलू देवरे, सागर कैलास आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. स्काऊट गाईड विभागाच्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार संचलन सादर करत, भारतीय तिरंग्याला मानवंदना दिली. विद्यालयाचे विद्यार्थी नरेंद्र शिंदे,विप्रांती अहिरे,धनश्री अहिरराव,शाहू हिरे यांनी विद्यार्थ्यांसमोर आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख अतिथी संस्थेच्या सेक्रेटरी मीना देवरे,प्राचार्य एस.एन.पाटील यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे विद्यार्थी राजमुद्रा निकम व रिंकल वसावे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख अजय बच्छाव व क्रांती सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. समूह गायनासाठी विद्यालयाचे संगीत विभाग तसेच क्रीडाविभाग,कलाविभाग. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. आनंदात पार पडलेल्या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन संजय देवरे व सेक्रेटरी मीना देवरे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे शिक्षक अजय बच्छाव यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.





