भारतराज पवार : राज्य मुख्य संपादक : ९१५८४१७१३१
राजाने मारलं आणि पावसानं झोडपलं तर तक्रार कुठे करणार !!!
देवळा : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल : कुबेर जाधव : काल परवा झालेल्या अवकाळी पावसामुळे कसमादे पट्ट्यातील शेतकऱ्यांचे फार मोठं नुकसान झालं.
कृषी मंत्री मा. माणिकराव कोकाटे पाहनी दौऱ्यावर आले होते.साहजिकच सामान्य शेतकऱ्यांनी कर्ज माफी बद्दल विचारल्यावर जे ऐकायला मिळाले ते अत्यंत अनपेक्षित आणि वेदना दायी आहे.
सातत्याने शेतकरी संकटात आहे.कधी अवकाळी पावसामुळे हाती आलेले पिकं वाया जाते.
कधी उत्पादीत मालाला बाजारात भाव नसतो.
कधी सरकारी शेतकरी विरोधी धोरणे आणि निर्यातबंदी अशा प्रकारामुळे गेले काही वर्षे सामान्य शेतकरी अडचणीत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना अशा प्रकारे वागणूक दिली जात असेल तर ते संपूर्ण चुकीचे आणि सत्तेच्या गुर्मीत आहे.
वास्तविक मा.मानिकराव हे शेतकरी असून सिन्नर सारख्या दुष्काळी भागातील आहे.त्यांना शेतकरी प्रश्नांची जाण आहे.परंतू शेतकऱ्यांना मदत करण्या ऐवजी अवमान कारक वक्तव्य करून सरकारला काय म्हणायचं आहे.
स्वतः सधन शेतकरी असून ही गरीबांच्या कोट्यातील घरे मिळविले.त्यासाठी सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करण्या एवजी त्यांचं खचिकरन होत आहे.” मंत्री जेवणार तुपाशी आणि शेतकरी मात्र उपाशी ” असेच म्हणण्याची वेळ माणिकराव यांनी आणली. माणिकरावांनी केलेल्या वक्तव्यामुळे येथील शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे. त्यांना समज देण्याची खूपच गरज आहे.
याबाबत सरकारने पुढाकार घेऊन मंत्री महोदय यांना समजावून सांगावे.
शेतकरी प्रश्नांना प्राथमिकता दिली जावी…
आणि शेतकरयांना अपमानास्पद वागणूक दिली जाऊ नये.. अशी काळजी घेतली तर अधिकच बरे वाटेल. एवढेच.
