भारतराज पवार , राज्य मुख्य संपादक. ९१५८४१७१३१ मालेगाव : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मालेगाव महानगर प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासन अधिकारी रविंद्र जाधव यांचेसह पालिकेचे अन्य प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी संयोग समुपदेशन केंद्राच्या विजयालक्ष्मी अहिरे , ऍड.गीतांजली बाफना , प्रतीक्षा भोसले आदी यावेळी उपस्थित होते.
कापडी पिशवीचा वापर वाढविण्यात आला तर प्लास्टिक पिशवी बंद होण्यास वेळ लागणार नाही आणि त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण सुद्धा होईल असे मत आयुक्त रविंद्र जाधव यांनी कार्यक्रमाच्या वेळी बोलतांना व्यक्त केले. यावेळी आयुक्त जाधव यांच्या हस्ते कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या.
मालेगाव महानगर पालिका मार्फत महिला व बालकल्याण विभागांतर्गत मनपा आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव, अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे, उपायुक्त पल्लवी शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे , प्लास्टिक मुक्त राज्य व मालेगाव शहर करून पर्यावरण विषयक जागृती निर्माण करण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप बचत गटांना विनामूल्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कापडी पिशवीच्या माध्यमातून माझी वसुंधरा , स्वच्छ भारत अभियान , सोनचीराईय्या आणि मालेगाव महानगर यांची जनजागृती महिला बचत गट यांच्या माध्यमातून होणार आहे.
कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे, उपायुक्त महिला व बालकल्याण पल्लवी शिरसाठ, उपायुक्त मुख्यालय गणेश शिंदे , शहर व्यवस्थापक रोहित कंनोर , लिपिक समृद्धी हिरे , सहाय्यक ओबेद शेख , नितीन महाजन बबिता सोनवणे यांसह अधिकारी , कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते , महिला आदी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती महाराष्ट्रातील घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात अगदी काही सेकंदात पोहोचविण्यासाठी संपर्क करा , भारतराज पवार , ९१५८४१७१३१
