भांब्री गावाला राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीपबाबा पाटील यांनी दिली भेट

0
18
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्य संपादक               महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात    ” पत्रकार ” नियुक्त करण्यात येत आहेत इच्छुकांनी संपर्क करावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क , मो.९१५८४१७१३१

 भांब्री : महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल नेटवर्क :   भांब्री येथील बसवंतपूर गावात अवैध धंद्यांना पोलिसांच्या आशीर्वादाने उत आला होता  त्यामुळे गावातील तरुण व्यसनांच्या आहारी जाऊ लागले होते तर अनेक महिलांच्या संसाराची अवस्था वाईट होण्याच्या मार्गावर लागली होती.त्यामुळे अवैध धंदे कायमचे बंद करण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळीच पाऊले उचलली आणि गावातील अवैध धंदे पोलिसांना बंद करणे भाग त्या पार्श्वभूमीवर गावाला  राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा  यांनी नुकतीच भेट दिली.गावातील सर्व हातभट्टी दारु आणी गांजा ची दुकाने कडेकोट बंद पाहून राष्ट्रीय अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले आणि समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

भांब्री बसवंतपुर गावातील अवैध हातभट्टी दारु बंद करावी या मागणी साठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतिने MIDC पोलीस ठाण्यावर पाई मोर्चा काढला होता.

आज राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी भांब्री गावाला भेट देऊन हातभट्टी ची दुकाने चालु आहेत का याची माहीती घेतली आसता, भांब्री गावातील सर्व हातभट्टी आणी गांजाची दुकाने कडेकोट बंद झाल्याची माहीती महीलांनी दिली.ही ताकद आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समितीची.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here