साल्हेर विकासापासून कोसो दूर ! तरीही भाजपचे जिल्हाध्यक्ष बनवाबनवी कोणासाठी आणि का करताय?

0
43

भारत पवार : राज्य मुख्य संपादक                              कणखर व रोख ठोक बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क.मो.९१५८४१७१३१

मालेगाव : कटा महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क  : भारत पवार , राजेंद्र राऊत – पाटील : मा.केंदित्री संरक्षण मंत्री तथा धुळ्याचे मा.खासदार डॉ.सुभाषबाबा भामरे यांच्या उमेदवारी वरून पक्षांतर्गत दुफळी निर्माण होऊन नाराजी नाट्य मतदार संघातील मतदारांना रंगल्याचे बघावयास मिळाले होते.त्यावर काही काळ मतदारांची चांगलीच करमणूक झाली खरी , मात्र आजही विकासापासून कोसो दूर असलेल्या खासदार बाबा साहेबांनी दत्तक घेतलेल्या बागलाण तालुक्यातील साल्हेर गावातल्या आदिवासी बांधवांच्या कपाळी बांधलेला वनवास आजही तेथील जनतेस भोगावा लागतो आहे.साल्हेर शेजारील भिकरसोंदा , पायरपाडा, महारदर येथीलही आदिवासी बांधवांच्या समस्या वर्षानुवर्ष खीचपत पडल्या आहेत.साल्हेर पर्यटन स्थळाच्या नावाने गावासाठी आणि परिसरासाठी केंद्रातील कोट्यावधीचा निधी नेमका जिरवला कुठे ? असा येथील संतप्त आदिवासी बांधव विचारीत असेल तरी देखील मालेगाव येथील रहिवासी आणि भाजप पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेश कचवे आणि शहराध्यक्ष देवा के.पाटील यांना याबाबत विचारले असता त्यांनी बनवाबनवीची खेळी पत्रकारांशी खेळल्याने ही बनवाबनवी उघड झाली आहे.

याबाबत देवा पाटील यांना विचारले असता त्यांनी जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांचे नाव घेऊन सांगितले की पत्रकारांचे याबाबतचे उत्तर ते देतील.तर कचवे यांना प्रत्यक्ष भेटीत विचारले असता मी जिल्हाध्यक्ष आहे जिल्ह्याचे काम करतो या बाबत मालेगाव शहर अध्यक्ष बोलतील.मग प्रश्न पडतो की ,  अशीच जर आता पासून यांची  बनवाबनवी चालू आहे ती कोणासाठी आणि कशासाठी ? म्हणजे जनतेस वेड बनून पेडे खाण्यात ही नेते मश्गूल असून ! अशी जर बागलाण तालुक्यातील अवस्था भयानक असून ती गत पाच वर्षांत उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांना केंद्राने निधी उपलब्ध करून देऊन सुद्धा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले तर मालेगाव बाह्य आणि धुळे मतदार संघाचा विकास भामरे करतीलच असे कशावरून ? असा प्रश्न येथील मालेगाव बाह्य मधील सुज्ञ नागरिक करत आहेत.याबाबचे उत्तर देण्यास भाजपचे वरील दोघ पदाधिकारी अपयशी ठरत आहेत.मात्र स्वतःला मीच खासदार अशी समज ह्या कचवे आणि पाटील यांनी करून घेतल्याचे त्यांच्या वागण्याच्या भुमिकेवरून दिसले. पत्रकारांना सन्मानाने कार्यालयात न बोलावणे आणि भेटलेच तर बोला मला वेळ नाही मला अर्जंट व्हीआयपी कामास जायचे आहे अशी ही यांची उत्तरे आणि बोलायची पद्धत .यावरून ही मंडळी सर्वसामान्य जनतेशी कशी वागत असतील याचा विचार केलेलाच बरा.त्यामुळे सुद्धा डॉ.सुभाष भामरे यांना मनस्ताप सहन करावा लागणार ? असेही वाटू लागले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here