बहिष्काराची भाषा करणारे अति उत्साही कार्यकर्ते अखेर लागले गळाला ! माळवाडीकरांची दशा आणि दिशा , डॉ.भारती पवार यांचे माळवाडी करांसाठी योगदान शून्य ! आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पोलीस यंत्रणेने माळवाडी गावी अती दक्ष राहण्याची गरज

0
21

भारत पवार  : राज्य मुख्य संपादक                           सडेतोड आणि रोख ठोक बातम्या आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : मो. ९१५८४१७१३१

देवळा / माळवाडी : कटा टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीचा धुराळा आरोप प्रत्यारोप करून काल ५ वाजता प्रचार यंत्रणा थंडावली. प्रचार सुरू असताना देवळा तालुक्यातील माळवाडी गावातील तरुण शेतकऱ्यांनी उमेदवार डॉ.भारती पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता आणि जो नेता शेतकऱ्याचे हित समजाऊन घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळून देईल त्यांनाच मतदान करणार आणि त्यासंदर्भात डिजिटल बोर्ड सुद्धा शेतकरी तरुणांनी गावात लावला होता.

याला कारण सुद्धा तसेच होते आणि आहे.डॉ.भारती पवार यांनी केंद्रात राज्यमंत्री मंत्री असताना पाच वर्षांत किती वेळा माळवाडी आणि फुले माळवाडी गावी येऊन येथील शेतकऱ्यांना ,येथील किती तरुणांना भेटल्या त्या शेतकऱ्यां मार्फत येथील जनतेच्या कोणत्या समस्या समजून घेतल्या किंवा माळवाडी , फुले माळवाडी गावी येऊन किती वेळा समस्त सर्वच जाती धर्माच्या नागरिकांच्या मीटिंग घेतल्या ह्या मीटिंग साठी किती पत्रकारांना सन्मानाने बोलाऊन बैठकी घेतल्या याबाबत त्यांचेकडे काहीतरी सबळ पुरावे छाचीत्र , बातम्या त्यांनी आज पर्यंत का जाहीर करू नये ? येथील जनतेची कोणती विकास कामे किंवा किती रुग्णांना त्यांनी स्वतः हातभार लावला ? ही जनताच आपले मत ” मतदान ” करतांना व्यक्त करणार. अनेक वस्तूंवर लादलेली जीएसटी , सातत्याने वाढत गेलेला गॅस सिलेंडरचा भाव , आणि त्यावर बंद केलेली सबसिडी  सातत्याने वाढत गेलेले पेट्रोल डिझेल चे भाव त्यामुळे अनेक पटीने वाढलेली महागाई , कांद्याच्या भावात केलेली घसरण , कांदा निर्यात बंदी त्यामुळे शेतकरीच काय ? गरीब , सर्वसामान्य जनतेचे जीवन जगणे नकोसे झाले आहे.निवडणूक लागली की मग काही वस्तुंचे भाव निमित्त साधून नाममात्र कमी करणे आणि निवडणूक झाली की पुन्हा भाववाढीचा भडिमार जनतेच्या माथी मारणे हि मोठी शोकांतिका आहे. केवळ मूठभर कार्यकर्ते डॉ.भारती पवार यांचे कडे जाऊन त्यांना पाठिंबा देणे ही अतिशय योक्ती म्हणायला हरकत नाही.त्यामुळे माळवाडी करांची दशा आणि दिशा ही भरकटत चालली आहे. आज पावेतो माळवाडी गावा साठीचे विकास नेतृत्व लोप पावले आहे.गत पाच वर्षे शिवाजी वामन बागुल हे सरपंच पदी असताना त्यांनी खरोखर गाव विकासाला गवसणी घातली होती.आज अति उत्साही आणि बहिष्काराची भाषा करणारे उतावळे शेतकऱ्यांचा ज्वलंत  कांदा प्रश्र्नी पुळका गुंडाळून उमेदवाराकडे स्वतः जाऊन भेट घेऊन त्यांच्या ( उमेदवाराच्या ) गळास लागून पाठींबा जाहीर करतात हे कितपत योग्य म्हणावे ? ह्या मूठभर कार्यकर्त्यांनी भारती पवार यांना कोणत्या अटी,शर्ती वर पाठींबा जाहीर केला ? त्या अटी, शर्ती डॉ.भारती पवार यांनी मान्य केल्या काय ? जर मान्य केले असतील तर तसे लेखी आश्वासन पवार यांनी ह्या उतावीळ कार्यकर्त्यांकडे दिले काय ? असा प्रश्न नागरिकात चर्चेला जात असून याबाबत ह्या उतावीळ कार्यकर्त्यां विषयी नाराजी सुद्धा व्यक्त केली जात आहे.

आज संपूर्ण रात्री तर उद्या सायंकाळ पर्यंत याबाबत देवळा येथील पोलिस यंत्रणेने अती दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे.कारण काल, परवा पर्यंत बहिष्कार टाकणारे आज मात्र पाठींबा जाहीर करत आहेत त्यामुळे आर्थिक व्यवहार होण्याची दाट शक्यता? नाकारता येत नाही म्हणून पोलिसांनी सजगता बाळगणे आवश्यक आहे.

जनहितार्थ प्रसारित.

निर्भयतेने मतदान करा आपले एक मत देशाचा इतिहास करू शकते. आश्वासनांवर विश्वास ठेवू नका., भुल थापांना बळी पडू नका…!

भारत पवार : राज्य मुख्य संपादक.                          ९१५८४१७१३१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here