देवळा पोलिसांनी झोपेत घेतले वाघास ताब्यात ,शिवव्याख्याते तथा राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक यशवंत गोसावी यांना अटक ? दबावशाही की हिटलर शाही ?

0
56
Oplus_131072

भारत पवार  : राज्य मुख्य संपादक.                         आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क मो. ९१५८४१७१३१

देवळा  : कटा.टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क. : सध्या लोकशाही धोक्यात आहे की धोक्यात केली जात आहे याचे मोठे कोडे आहे . आम जनतेस हेच  कळत नाही की लोकशाही मध्ये लोकांना अर्थात जनतेस मोकळे राहण्याचा किंवा कोणी काय करावे आणि काय करू नये ? याचा अधिकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे , भारतीय राज्यघटनेद्वारे प्रत्येकाला स्वतंत्र दिला आहे.परंतु काही आक्षेप घेण्यासारखे असेल तर पोलिसांनी त्या व्यक्तीस रीतसर आधी लेखी कळवले पाहिजे हा सुद्धा कायदा आहे.म्हणून कोणासही आणि कोणाच्याही घरी अचानक मे भयानक रूप दाखविता येत नाही. किंवा तसा कोर्टाचा आदेश पोलिसांकडे असावा लागतो जर असे काही नसेल तर झोपेत वाघाची शिकार केल्या सारखे होऊन पोलिसांची ही हिटलरशाही की दबाव शाही ? आहे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेस होतो.आणि पोलिसांच्या ह्या भूमिकेमुळे एखाद्या पालकास , किंवा ज्या व्यक्तीस उचलले जाते त्या व्यक्तीस हार्टअटॅक , ब्लड प्रेशर सारखे भयानक प्रसंग ओढवला तर याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का ? हा महत्वाचा प्रश्न येथे निर्माण होतो.

झाले असे की आज दुपारी १ वा. पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित केली आहे.मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कांदा पिकाविषयी खूपच वाईट अवस्था करून टाकलीय त्यामुळे तमाम शेतकऱ्यांचे जीवन जगणे मुश्कील झाले आहे.की केले आहे आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.त्यामुळे देवळा तालुक्यातील माळवाडी गावातील रहिवासी प्रख्यात शिवव्याख्याते तथा शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक यशवंत गोसावी यांनी एका यु ट्यूब चॅनलला मुलाखत देताना सांगितले होते की , कांदा प्रश्न भयानक असून शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.त्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन यशवंत गोसावी यांनी सांगितले की मोदींची सभा आम्ही होऊ देणार नाही. त्यामुळे देवळा पोलिसांनी गोसावी यांना कोणत्याही प्रकारची प्रथम नोटीस किंवा मॅसेज न देता डायरेक्ट पोलीस व्हॅन आणून यशवंत गोसावी यांना त्यांच्या घरून सकाळी ७ वाजता  ताब्यात घेतले.म्हणजेच झोपेत वाघाची शिकार करणे हे कितपत योग्य आहे ? यास न्याय आहे की नाही . त्यामुळे पोलिसांची ही दडपशाही / दबावशाही की हिटलर शाही आहे याचे उत्तर त्यांचे कडून मिळेल काय ? असा सवाल गोसावी समर्थकांनी यावेळी केला आहे.येथीलच काय देशातील  समस्त शेतकरी , मजूर , सर्वसामान्य व्यक्तीची अत्यंत वाईट अवस्था आहे, जीवन जगणे मुश्कील झाले आहे हे पोलिसांना देखील माहीत आहे मग अशा वेळी समज देणे ऐवजी कोणतीही पूर्वसूचना न देता एखाद्या व्यक्तीस अचानक उचलून घेऊन जाणे हे कायद्याने योग्य आहे का? याचे उत्तर पोलिसांकडे आहे का ? त्यांनी कायदा हातात का घ्यावा ? सर्वसामान्य लोकांना कायदा आहे, पोलिसांना कायदा नाही काय ? हा प्रश्न गोसावी कुटुंबीयांना व गोसावी समर्थकांना पडला असून पोलिसांच्या ह्या भूमिके बाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

याविषयी देवळा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांचेशी संपर्क केला असता  त्यांनी सांगितले की, फक्त शहा निशा करण्या साठी गोसावी यांना ताब्यात घेतले असून अटक केलेली नाही असे पाटील यांनी मोबाईल फोन वरून महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले. असे जर असेल तर गोसावी यांची शहा निशा करून तात्काळ न सोडविण्याचे कारण काय असा प्रश्न गावात चर्चिला जात आहे.त्यामुळे माळवाडी  गावात संताप व्यक्त केला जात आहे.तर देवळा तालुक्यातील गोसावी समर्थकांमध्ये तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. देवळा पोलिसांनी पूर्वसूचना न देता कायदा हातात घेण्यासारखा प्रकार केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

आज दुपारी यशवंत गोसावी यांची येवला येथे प्रचार सभा आयोजित केली होती त्याचे काय ? याबाबत देवळा पोलीस कोणते सहकार्य करणार ? असेही विचारले जात आहे.

Oplus_131072
Oplus_131072

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here