मंत्री ,आमदारांना उघड चॅलेंज : मला विधान सभेत बोलवा आणि बघा तुमच्या अब्रूची लक्तरे कशी वेशीवर टांगतो : शिक्षक शिवाजी टेकुलवार

0
1247

भारत पवार : मुख्य संपादक  : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क साधावा.तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : मो.९१५८४१७१३१ 

जिंतूर ( परभणी ) _ कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : परभनी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथील जि. प.शाळेतील प्राथमिक शिक्षक शिवाजी टेकुलवार यांनी आजच्या राजकीय पुढार्‍यांनी समाज विकासाच्या नावाच्या आडून स्व विकास करण्या साठी राजकारणास वाहून घेतले.त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण खूपच गजकरणा सारखे झाले असून म्हणूनच अधून मधून राजकीय गोटात राजकारणाची चांगलीच खाज सुटते हे आपण जाणतोच.त्यामुळेच जोगवाडा येथील प्राथमिक शिक्षक शिवाजी टेकूलवार यांचा संताप खूपच अनावर झाला असून त्यांनी थेट महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदार यांना खुले चॅलेंज केले की,मला फक्त विधानसभेत बोलवा बघा तुमची लक्तरे कशी वेशीवर टांगतो महाराष्ट्र न्यूज शी बोलताना त्यांनी सांगितले यावेळी मीडिया मधून त्यांनी मुख्यमंत्री यांना थेट पत्र लिहीत चॅलेंज केले ….

मा. मुख्यमंत्री साहेब.
विद्यमान सर्व मंत्रिमंडळ,
सर्वच आमदार (सत्ताधारी व विरोधक). महाराष्ट्र राज्य.
सर्वांना कुस्नेह नमस्कार,
*स्वरक्षणाचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जोरदार आक्रमण*
साहेब मी एक शासकीय कर्मचारी असून मी तुम्हा सर्वांना *उघड जाहीर आव्हान (चॅलेंज)* देत आहे की, तुम्ही *माझ्यावर एक हक्कभंग प्रस्ताव आणा. व मला विधानसभेत बोलवा. मग मी तुमच्या (राजकारण्यांची) अब्रू ची लक्तरे काढून कशी वेशीवर टांगतो ते पहा.* आणि जर मी अस नाही करू शकलो तर, मी माझं नाव *प्रा. शिक्षक शिवाजी टेकुलवार सर* असं नाही सांगणार. सांगा स्वीकारणार का माझं हे आव्हान?
साहेब शिक्षण विभागात जे तुम्ही मुलांना शालेय पोषन आहार (MDM) देता.जे पोषक व पौष्टिक आहे असं तुम्ही म्हणता. तेच पोषण आहार तुम्ही विधान सभेच्या कॅन्टीन मध्ये सुरू करा. त्यासाठी मी स्वतः प्रति मंत्री व आमदार यांना दररोजचे 2.08 पैसे याप्रमाणे एका महिन्याचं बिल मी स्वतः खिशातून (स्वखुशीने व स्ववर्गणीने) देतो. एक महिना तुम्ही हे स्वतः खा. आणि नंतर सांगा की शालेय पोषण आहार योजना राबवायची की नाही?
*भीक नको पण कुत्रा आवर*
तुम्हाला प्रत्येकच योजनेत लोकसहभाग हवा आहे. *भिकारडे* हाच तुमचा मुख्य धंदा झाला आहे. *परंतु तुम्हाला तुमचा पगार, भत्ते व पेन्शन वाढवायला मात्र तिजोरीत भरपूर पैसे आहेत.* पण बाकी सर्वच योजनांमध्ये तुम्हाला लोकवर्गणी पाहिजे, कारण यावेळेस मात्र तिजोरीत पैसेच नसतात. *याची लाज वाटायला पाहिजे तुम्हाला.* आणि म्हणूनच तुमचा (हेतू) धंदा पूर्ण करण्यासाठी,मी येत्या दि. 01/09/23 पासून MDM चे अनुदान बिलकुलच घेणार नाही.व ऑनलाईन माहिती पण भरणारच नाही.गॅस (कमर्शियल), भाजीपाला व आठवड्यातून एकदा पूरक आहार हे सर्व मी *माझ्या स्वखर्चाने माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी करणार आहे. व शाळेत MDM योजना सुरूच ठेवणार आहे.* तसेच शाळा अनुदान सुद्धा घेणारच नाही. माझ्या शाळेसाठी सर्व शालेय साहित्याची खरेदी सुद्धा मी *स्वखर्चाने* करणार आहे. यामुळे कुठल्याच ऑडिटची, विविध टपालांची झंझटच माझ्यामागे उरणार नाही.
*प्रौढ निरक्षर सर्वे तर मी बिलकुलच करणार नाही.* कारण हे (अशैक्षणिक) काम माझं नाहीच.
साहेब तुम्ही लोकसेवक आहात व मी कर्मचारी आहे. तुम्ही जनते प्रति (मतदार) व मी विद्यार्थी यांच्या प्रति, आपण दोघेही बांधील आहोत. कारण आपण दोघेही जनतेच्या कररुपी पैशांमधूनच पगार घेतोत. तुम्ही दरमहा विविध *सोयी सवलती व दोन लक्ष 40 हजार रुपये रुपये पगार घेता.* आणि मी कर्मचारी असून दरमहा 70 हजार रुपये पगार मला देता. मग 240000 रू. पगार घेऊन तुम्ही तुमची खरी कामे करता का? जनतेची मूळ समस्या रुपी प्रश्न कधी विधानसभेत मांडता का? *एकाही आमदारांना शिक्षकांची ही अशैक्षणिक कामांची व्यथा कधी दिसलीच नाही का?* आणि जर *तुम्ही तुमची ही कामे केली असती तर, मला असं बोलण्याची संधीच मिळाली नसती.* पण दुर्दैवानं तुम्ही असं करतच नाहीत. आणि हो मला मात्र नुसता पगार देऊन माझं मूळ शिकवण्याचं काम तुम्ही मला अशैक्षणिक कामात व तुमच्या मोकाट योजनांमध्ये गुंतवून करूच देत नाहीत. मग मी फक्त फालतू अशैक्षणिक कामे करण्याचाच पगार घ्यायचा का? *तुमच्यासारखं फुकटचा पगार घेणे मला नाही जमणार.* तुम्ही जनतेची कामे करा. जनते प्रति कृतघ्न होऊ नका. आणि माझं मूळ काम मुलांना शिकवण्याचं मला तेच करू द्या. *कारण मी एक शिक्षक आहे व मी माझ्या विद्यार्थ्यांप्रती तुमच्यासारखं कृतघ्न कधीच होणार नाही.* म्हणूनच तुम्हाला तुमचं मूळ काम शिकविण्यासाठी व मला माझं मूळ काम तुम्ही करू देण्यासाठी.मला एकदा विधानसभेत बोलवाच.कारण मी एक गुरुजी आहे. *गुरुच्या एका हातात ज्ञानदान, नीती, तत्त्व, निष्ठा, संस्कार हे रुजवणेरुपी शास्त्र असते. तर दुसऱ्या हातात अती विध्वंसकारक वैचारिक लेखनरुपी शस्त्र असते.* माझ्या शिक्षक (सदरक्षणाय खलनिग्रहणाय) धर्माप्रमाणे मला एका हातात शास्त्र व दुसऱ्या हातात शस्त्र घेऊन चालावेच लागेल. *तरच माझा व शिक्षणाचा टिकाव लागेल.* अन्यथा तुम्ही सर्व बख्तीयार खिलजी होऊन माझ्या जिल्हा परिषद रुपी शाळेस नालंदा विद्यापीठासारखं जाळून भस्म करून टाकाल.
आता हे माझं आव्हान कोणाला जास्त झोंबेल तर जे कोणी सत्ताधारी व विरोधक जनतेची मूळ प्रश्न विधानसभेत न मांडून आपलं मूळ काम करत नाहीत. फक्त त्यांनाच हे जास्त झोंबेल. आता जे कोणी मंत्री,आमदार माझ्या या आव्हानावर तिखट प्रतिक्रिया देतील.(नक्कीच द्या). व राजकारण करतील. पण मला विधानसभेत बोलावणार नाहीत. *तर हे आपोआपच सिद्ध होईल की मी किती परमसत्य बोललोय.* आणि तुम्ही सगळेच जण या परमसत्याला किती घाबरत आहात.
आणि म्हणून मला एकदा विधानसभेत बोलवाच.मग माझं काही चुकलंच तर माझं निलंबनच काय, मला सरळ फासावर लटकवा.
*जय हिंद,जय संविधान*
*जि प शाळा व शिक्षक वाचवा.*
महाराष्ट्रातील एक उद्विग्न, लाचार, मनोरुग्ण, गरीब व पोटार्थी शिक्षक.
टेकुलवार शिवाजी लक्ष्मण
जि प प्रा शाळा माणकेश्वर जो.
केंद्र:-जोगवाडा ता. जिंतूर जि. परभणी
मो. नं:- 7020650167
tekulwar1982@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here