सिडको घरांच्या किंमती कमी करण्यासंदर्भात शासनाला प्रस्ताव पाठवणार : डॉ.संजय मुखर्जी
1 min read
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क साधावा.तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्र न्यूज .मो.9158417131

नवी मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : सचिन कदम : बामणडोंगरी, उलवे येथे ७,८४९ पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या वाढीव किंमती कमी करण्यासंदर्भात राज्य शासनाला सिडको सकारात्मक प्रस्ताव पाठवणार व राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे घरांच्या किंमती कमी करण्याबाबत निर्णय घेणार असे आज सिडको व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे, सिडको सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, मनसे शहर सचिव सचिन कदम, सिडको महाव्यवस्थापक फैय्याज खान व सिडको सोडतधारक यांच्या बैठकीत ठरले.
तसेच सोडतधारकांना कागदपत्र पडताळणीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याचे सिडकोने जाहीर केले. त्यासोबतच ७५,००० रुपये अनामत रक्कम शासनाचा पुढील निर्णय येईपर्यंत रद्द होणार नाही असे आश्वासन डॉ. संजय मुखर्जी यांनी दिले.
यावेळी बेलापूर सिडको भवन येथे हजारोंच्या संख्येने सिडको सोडतधारक आपल्या परिवारासह हजर होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक व महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.