संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील घर भ्रष्टाचारास आशीर्वाद कोणाचा ? त्या निर्लज्ज अधिकाऱ्यांवर वनमंत्री बडगा उगारतील का कारवाईचा ? : संजय बोर्डे

0
83

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : मो.9158417131

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मुंबई वनखात्याचे अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडले असून ह्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना आशीर्वाद कोणाचा ? त्यांचेवर वनमंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी  कारवाईचा बडगा उगारून अन्याय केलेल्या रहिवाश्यांना न्याय द्यावा अशी मागणी संपादक संजय बोर्डे यांनी मीडिया द्वारे वनमंत्री यांचे कडे केली आहे. बोर्डे यांनी म्हटले आहे की संघर्ष नगर चांदिवली येथे एकाच व्यक्तीच्या नावे २वेळा सदनिका अलॉटमेंट भारताची आर्थिक राजधानी म्हणल्या जाणाऱ्या मुंबई शहरामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानातील रहिवाशांना अतिक्रमणाच्या नावाखाली २३ वर्षांपूर्वी निष्काशित करण्यात आले होते. फक्त १३५०० रहिवाश्यांना घरे मिळाले आहेत, १६५००० रहिवाशी अजूनही घराच्या प्रतीक्षेत आहेत.

आता एक नवीनच घोटाळा उघडकीस आला आहे. या ठिकाणी ५०वर्षापासून राहणारे रहिवासी झनकराव न्यानाजी पाडमुख यांचे नकली कागदपत्रे बनवून वनविभागाचे अधिकारी व दलाल लोकांनी २००९ मध्ये ००४/२१/ई या सदनिकेचे नकली अलॉटमेंट काढून सदनिका प्राप्त केली व लगेच इतरांना विकली. ही बाब २०१३ मध्ये उघड झाली. विशेष म्हणजे सदनिका अलर्टमेंट करताना तक्रार निवारण समितीमध्ये ४ अधिकाऱ्यांच्या सह्या असतात. परंतु हे नकली अलॉटमेंट दिल्या गेल्याने निश्चितच यामध्ये अधिकाऱ्यांचा सुद्धा सहभाग आहे हे स्पष्ट होते. त्यावेळेस वनविभाग, मुख्यमंत्री, गृहमंत्री, वनमंत्री, साकीनाका पोलीस ठाणे या ठिकाणी वेळोवेळी तक्रार करून सदर सदनिका पाडमुख यांनी ताब्यात घेतली. झनकराव पाडमुख हे अशिक्षित असल्याने. २०१३ मध्ये पुन्हा त्यांना एकदा त्यांच्या नावे संबंधित अधिकारी व दलाल लोकांनी परस्पर नकली अलॉटमेंट पेपर दिले.२०१३ पासून आज पर्यंत पाडमुख परिवार संघर्ष नगर चांदीवली या ठिकाणी राहत आहे. परंतु डिसेंबर २०२२ मध्ये अचानक रोहिणी भिकाजी फलके नावाच्या महिलेने साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार करून सदर रूम मि दलाला कडून विकत घेतली आहे विकत घेतली आहे असा अर्ज केला. व पुन्हा एकदा हे प्रकरण उघड झाले. पाडमुख यांनी पुन्हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे धाव घेतली असता
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी इतके भ्रष्ट आहेत की, २३वर्ष झाले पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या लोकांना परेशान करून सोडलेले आहे.
एकाच व्यक्तीच्या नावाचे दोन दोन वेळा नकली अलॉटमेंट काढणे,पात्र रहिवाशांना घर न देता अपात्र असणाऱ्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांना घर देणे.आजपर्यंत 400 च्या वर नकली पावत्या माझ्या प्रयत्नाने पकडून दिले आहेत. भ्रष्टाचार ओपन करणाऱ्या व घोटाळा बाहेर काढणाऱ्या पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांना धमकावणे व यांना खोट्या गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करणे. वनविभागाच्या हद्दीमध्ये डुकरे पाळणाऱ्या लोकांना अभय देणे, वीज चोरी करणाऱ्याला अभय देणे. मोकळ्या जागेवर झोपड्या बांधणाऱ्याला मदत करणे. अशा सर्व प्रकार सर्रास या ठिकाणी होत आहेत. परंतु गेंड्याच्या कातडीचे अधिकाऱ्यांना काही फरक पडत नाही अशा अधिकाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे,नकली अलॉटमेंट काढणारे हेच ते दांपत्य वरील चित्रात दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here