दिवाळी नंतरच राज्यातील मनपा, जि.प.निवडणुकांचा बार फुटणार ,कोणाची पुन्हा दिवाळी होणार तर कोणाचं दिवाळ निघणार…

0
80

भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : जाहिरात आणि बातम्या साठी संपर्क : मो.९१५८४१७१३१

मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क : महाराष्ट्रातील २२ महानगर पालिका, सहा जिल्हा परिषद,नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बार दिवाळी नंतरच फुटणार असल्याची दाट शक्यता आहे.निवडणुका जून, जुलै मध्ये घेण्यास निवडणूक आयोग तयार असल्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहे.ते चुकीचे असून असे कोणतेही प्रतिज्ञापत्र आयोगाने दिलेले नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जून, जुलै मध्ये निवडणूक होणार याबाबत अनेक वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यामुळे अनेक उतावीळ इच्छुक निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत असतानाचे चित्र दिसत होते तर रात्रीच्या राजकीय गप्पांना ऊत येत होता.परंतु निवडणूक होणार या बातमी बाबत सर्वोच्च न्यायालयात कोणतेही प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने दाखल केलेले नाही अशी माहिती आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. एकूण २२ नगरपालिका ,२५ जिल्हा परिषद,२७५ पंचायत समिती,२१० नगरपालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुका एकाच वेळी घेणे शक्य नाही त्या दोन तीन टप्प्यात घ्याव्या लागतील असे ही आयोगाने म्हटले आहे.त्यामुळे ४ मे रोजी जरी सुनावणी नाही झाली तरी जून ,जुलै मध्ये किंवा पावसाळ्या पूर्वी या निवडणुका होण्याची शक्यता नाही.दिवाळी नंतरच या निवडणुकांचा बार फुटणार हे आता स्पष्ट झाले आहे.तसेच ही प्रक्रिया सुरू झाली तरी किमान ३५ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असतो त्यामुळे महाविकास आघाडी विरुध्द भाजपची राजकीय खेळी किंवा राजकीय दिवाळीचे लाडू होणार एवढे मात्र नक्की झाले आहे.त्यामुळे आता मुदत संपलेल्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दिवाळी नंतरच होतील हे आता निश्चित होऊ लागले आहे त्यामुळे अजून काही महिने निवडणुकांसाठी वाट पाहण्याची वेळ ही राजकीय दृष्ट्या सर्व उमेदवारांवर आलेली आहे.मुदत संपलेल्या अजून पर्यंत संपणाऱ्या महानगर पालिका कोल्हापूर, पुणे,पिंपरी चिंचवड,ठाणे,भिवंडी,निजामपूर,मुंबई,नवी मुंबई,कल्याण,डोंबिवली,उल्हासनगर,वसई,विरार,पनवेल, मालेगाव ,नागपूर,सोलापूर,अकोला,परभणी,लातूर,अमरावती,चंद्रपूर, नांदेड आणि औरंगाबाद अशा २२ मनपा आहेत.त्यांची मुदत जून मध्ये संपत आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here