Home Breaking दादा… ! अपघातानंतर किंवा घातपाता नंतर आम्ही किती दिवस गप्प बसावे ?...

दादा… ! अपघातानंतर किंवा घातपाता नंतर आम्ही किती दिवस गप्प बसावे ? अजूनही चौकशीचा मागमूस नाही

0
5
Oplus_131072

भारत पवार : राज्य मुख्यसंपादक : ९१५८४१७१३१    मुंबई :  क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : दादा …. आपल्याला जाऊन चार महिने झालीत…… ना विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला ….. ना सी.सी.टी .व्ही  फुटेजेस सार्वजनिक केले केलेत……. ना सी.बी.आय.चौकशी सुरू झाली….. जो तो नेता आपापल्या सग्या सोयऱ्यांना , मुलाबाळांना  राजकारणात सेट करण्याच्या प्रयत्नात आखंड बुडून गेला आहे. मग , तुमच्या जाण्याने आमच्या सारखी सामान्य घरातील कार्यकर्ते मात्र पोरके झाले आहेत. आपल्या अपघाताची चौकशी  करण्याचा विषय चारच महिन्यात मिडियात देखील बराचसा मागे पडला आहे. नव्हे चौकशीचा मागमूसच नाही……  पण …

दादा एक मात्र सांगतो की, महाराष्ट्रातला शेवटचा माणूस तुमच्या कामाला , तुमच्यातला कामाच्या माणसाला सर्वांच्या हक्काच्या दादांना विसरलेला नाही.आणि वसरणारही नाही. ….  तुम्हीच सांगा दादा आपल्या लढवय्या राजकीय बापाच्या अपघातानंतर आम्ही किती दिवस गप्प बसावे ??? …..                                             ____  उदयकुमार आहेर , प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here