Home Breaking अधिकाराचे व कर्तव्याचे भान विसरून बेभान होऊन बेताल वक्तव्य करणाऱ्या शहाचा देवळा...

अधिकाराचे व कर्तव्याचे भान विसरून बेभान होऊन बेताल वक्तव्य करणाऱ्या शहाचा देवळा येथे निषेध , दिनेश अहिरे यांच्या नेतृत्वाने मोर्चा संपन्न

0
96
Oplus_131072

 ( निषेध मोर्चाचे  निवेदन स्वीकारताना डावी कडून देवळा तहसीलचे नायब तहसिलदार अहिरराव ,  पो. नि. ज्ञानेश्वर जाधव तर निवेदन देताना राहुल केदारे , शांताराम पवार , शिवसेना ( शिंदे गट) जिल्हा अध्यक्ष दिनेश अहिरे व समस्त समाज बांधव वरील छायाचित्रात दिसत आहेत. )                            भारत पवार : राज्य मुख्यसंपादक.                            जाहिराती आणि बातम्या साठी बेधडक संपर्क करा. महाराष्ट्र न्यूज , मो. ९१५८४१७१३१ 

देवळा : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी अपशब्द बोलून गरळ ओकल्याने शहा यांचे विरोधात संपूर्ण देशात निषेध व्यक्त केला जात असून आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री पदाचा अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सर्व स्तरावरून होऊ लागली आहे. याचाच भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे शिवसेना ( शिंदे गट) जिल्हा अध्यक्ष दिनेश अहिरे यांच्या  नेतृत्वाखाली देवळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरच निषेध मोर्चा काढण्यात आला.

मोर्चाची सुरुवात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून करून देवळा – नाशिक रस्त्यावर मोर्चेकरी थांबून होते.सुमारे अर्धा तास दोघा बाजून ट्रॅफिक चक्काजाम झाली होती. निषेधाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

डॉ.बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाला दिलेले संविधान जगात सर्वश्रेष्ठ असून हे अमेरिका , रशिया , आफ्रिका देशांनी सुद्धा मान्य केले आहे.असे असताना आपल्या अधिकाराचे आणि कर्तव्याचे भान विसरून बेभान होऊन बेताल वक्तव्य शहा यांनी करून देशात दुही माजविण्याचे काम केल्याने आम्ही ह्या घटनेचा आणि परभणी जिल्ह्यातील संविधान रक्षक सूर्यवंशी याचा निर्घृण पने पोलीस कस्टडीमध्ये खून करण्यात आला ह्या घटनेचा आम्ही सर्व समाजबांधव तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे दिनेश अहिरे , शांताराम पवार यांनी यावेळी सांगितले. तर बेताल वक्तव्ये करून देशातील शांततेस गालबोट लाऊन शांतता बिघडवून दूही माजवणारे केंद्रीय गृहमंत्री शहा आणि परभणी येथील सूर्यवंशी यांच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व महाराष्ट्राचे गृहमंत्री असणारे फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात अशी मागणी यावेळी दिनेश अहिरे, शांताराम पवार, भारतराज पवार , राहुल केदारे  यांनी यावेळी केली.

यावेळी दिनेश अहिरे, भारतराज पवार , शांताराम पवार, कैलास रमेश पवार ( आर.पी.आय.  आठवले देवळा ता.अध्यक्ष ) , संदीप जाधव , किरण गांगुर्डे, नितीन अहिरे , शांताराम बच्छाव , आप्पा केदारे , समाधान केदारे, नगरसेवक कैलास पवार , सुनील पवार, राजेंद्र जगताप, पुंडलिक केदारे, कल्पेश पवार ,विलास माळी, बाळा जाधव ,सुनील अहिरे ,शिवमन केदारे, हिरामण सोनवणे , सिद्धार्थ अहिरे , लखन पवार ,यश निर्भवणे, शरद अहिरे , प्रेम पवार , पियुष पवार , रमेश पवार  गोविंद सोनवणे , उमेश सोनवणे , प्रकाश गरुड , मुकेश गरुड , श्रीकांत केदारे आदींसह अनेक आंबेडकरी नेते व कार्यकर्ते मोर्चास उपस्थित होते .

प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार अहिरराव , देवळा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी मोर्चा स्थळी येऊन मोर्चा करांच्या वतीने निवेदन स्वीकारून शासनास तुमच्या भावना आम्ही लगेच कळवतो असे आश्वासन नायब तहसीलदार अहिरराव यांनी प्रशासनाच्या वतीने मोर्चेकरांना यावेळी दिले.

Oplus_131072
Oplus_131072

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here