Home Breaking देव माणसाची हॅट्रिक , चांदवड देवळा तालुक्यातील जनतेने फडणवीसांचा शब्द पाळला जनतेच्या...

देव माणसाची हॅट्रिक , चांदवड देवळा तालुक्यातील जनतेने फडणवीसांचा शब्द पाळला जनतेच्या आशा पल्लवीत

0
96
Oplus_131072
Oplus_131072
Oplus_131072
Oplus_131072

भारत पवार. : मुख्य संपादक                                    आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : मो. ९१५८४१७१३१

देवळा / चांदवड  : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिण पॅटर्न जोरदार चालल्याने बऱ्याच ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांना चारी मुंड्या चित व्हावे लागले. हे पॅटर्न महिलांनी विशेष हाती घेतल्याचे प्रत्येक मतदान केंद्रावर स्वतः भेट देत असताना महिलांच्या गर्दीने आणि त्यांच्यातील उत्स्फूर्त प्रतिसादाने दिसले. इतके की , सद्ध्याच्या तयार होणाऱ्या भाजप – महायुती  सरकारला विरोधी पक्ष नावाला सुद्धा जनतेने ठेवला नाही.अर्थात एक हाती बहुमत सरकार असणार आहे. हे सरकार जनहिताचे काय निर्णय घेते आणि महागाईच्या बाबतीत काय भूमिका घेते , वाढवणार की जैसे थे ठेवणार की कमी करणार याकडे महाराष्ट्रातील जनता आशाळभूत नजरेने बघत आहे.

तर देवळा चांदवड विधानसभा मतदार संघात जनतेच्या मनातील देव माणूस डॉ.राहुल आहेर यांनी हॅट्रिक साधत तिसऱ्यांदा विजय मिळवला. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आ.डॉ.राहुल आहेर यांच्या कडे येथील जनता महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून पाहू लागली आहे.आणि त्याला कारणही तसेच आहे देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. राहुल आहेर यांच्या प्रचारार्थ चांदवड येथे जनतेसमोर बोलतांना सांगितले होते की, तुम्ही मला आमदार द्या मी तुम्हाला कॅबिनेट मंत्री देतो . पुढे ते म्हणाले होते की, २० हजार पर्यंत लीड दिले तर राज्यमंत्री पद देईल आणि २० हजाराच्या पुढे लीड दिल्यास तर कॅबिनेट मंत्रीपद देणार . असा शब्द दिला होता त्यांच्या शब्दास चांदवड देवळा मतदार संघातील जनतेने भरभरून मतदान रुपी प्रतिसाद दिल्याने जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जनतेच्या मनातील देव माणूस डॉ.राहुल आहेर आमदार झाल्याने त्यांनी तब्बल ५० हजार मतांचा लीड मिळवून जनतेच्या मनातील मंत्री म्हणून आशा पल्लवीत झाल्या आहेत.

११ नोव्हेंबर मध्ये  महाराष्ट्र न्यूज  ह्या वेब चॅनल मधील कानोसा ह्या सदरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या सोज्वळ , सुसंस्कृत व नम्रता असलेले डॉ. राहुल आहेर आणतील चांदवड देवळा मतदार संघाला विकासाची झळाळी – सुर जनतेचा ह्या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती. तसेच १७ नोव्हेंबर रोजी चांदवड देवळा मतदार संघात ” विकासाची गंगोत्री ” आणणार _  डॉ.राहुल आहेर ! डॉ.राहुल आहेरांना निवडून आणणार _  जनता . ह्या मथळ्याखाली दुसरी बातमी दुसरी बातमी प्रकाशित करण्यात आली होती. आमच्या ह्या दोघा बातमीचे लिखाण खरे ठरल्याने आणि  जनतेचा  “कानोसा ” खरा ठरल्याने चांदवड –  देवळा तालुक्यातील अनेक जागृत मतदारांनी महाराष्ट्र न्यूज मधील लिखाणाचे कौतुक केले आहे. त्यामुळे आमदार डॉ.राहुल आहेर यांची अधिकच जबाबदारी वाढली असून गत दहा वर्षातील रेकॉर्ड मोडून काढून चांदवड तालुक्याबरोबरच देवळा आणि देवळा तालुक्यातील जनतेकडे अधिक लक्ष देऊन विकास कामांची झळाळी अधिकच चमकदार करावी अशी हक्काची अपेक्षा येथील जनतेने महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून आ.डॉ.राहुल आहेर यांचे कडे व्यक्त केली आहे.आणि ती अपेक्षा डॉ.राहुल दादा पूर्ण करणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे .असा विश्वास सुद्धा जनतेने व्यक्त केला.

चांदवड येथील तहसील कार्यालयात मतमोजणीस सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला .टपाली मतांमध्ये ८२३ मते घेत डॉ.राहुल आहेर यांनी आघाडी घेतली.आणि ती शेवट पर्यंत टिकून ठेवली. देवळा तालुक्यातील जनतेने डॉ.राहुल आहेर यांना २७,५३९ मते घेत आघाडी घेतली तालुक्यातून एकूण ५३,७०९ मते घेतली. महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीष कुमार कोतवाल यांना २४७७ मतांवरच समाधान मानून घ्यावे लागले. तर प्रहारचे गणेश निंबाळकर यांना ५६७९ मते मिळाली.अपक्ष उमेदवार केदा आहेर यांना होमपीच वरतीच देवळा येथून फक्त २६७० मते मिळाली.त्यामुळे केदा आहेर यांचे नेतृत्व नकोच असे जनतेने केलेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून  स्पष्ट दिसते.

चांदवड तालुक्यातून आ.डॉ.राहुल आहेर यांना ५० ,२९४ ,  कोतवाल यांना २० , १३२ , निंबाळकर यांना ४९ , ७८१ , तर केदा आहेर यांना २२ , २५२ मते मिळाली.तर आ.डॉ.राहुल आहेर यांना एकून मतांची आकडेवारी एक लाख ४ ह.८२६ मते , निंबाळकर यांना ५५ ह.८६५ , केदा आहेर यांना ४८ ह.७२४ तर उमेदवार कोतवाल यांना चौथ्या स्थानी ठेऊन फक्त २३ ह.३३५ मतांवर समाधान फुलून घ्यावे लागले.

डॉ.राहुल आहेर आमदार पदी विजयी घोषित होताच चाहत्यांनी चांदवड व देवळा येथे तोबा गर्दी करून गुलालाची उधळण करायला सुरुवात केली .यावेळी घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता. त्यातच फटाक्यांची जोरदार सलामी जनतेचे लक्ष वेधून घेत होते. तर देवळा , माळवाडी गावी सुद्धा फटाके फोडून गुलालाची उधळण करत तुफान गर्दीत शांततेत जल्लोष साजरा करण्यात आला .

मात्र आता आस लागली त्या कॅबिनेट मंत्री पदाच्या शब्दाची खरे होण्याची.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here