माळवाडी ( देवळा) येथील ग्रामस्थांच्या “त्या जखमा ठसठसतायेत “…वाचा सविस्तर…

0
64

परखड, निर्भिड, सडेतोड ,निर्णायक लिखाण असलेले आणि 80,000 + वाचक संख्या असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर 1 कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी आपल्या परिसरातील बातम्या , जाहिरात करीता अवश्य संपर्क करा .तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात ” पत्रकार ” नियुक्ती करण्यात येत आहे.इच्छुक असलेल्या युवक, युवतींनी अवश्य संपर्क करा : भारत पवार : मुख्य संपादक : मो.9158417131

देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी येथील ग्रामस्थांच्या ” त्या जखमा ठसठसतायेत ” अशी भयानक अवस्था येथील ग्रामस्थांची झाली असून ग्रामस्थांना संबंधित अधिकारी यांचे कडून योग्य न्याय न मिळाल्यास त्या जखमा कधी फुटतील याची कल्पना च न केलेली बरी याची सर्व जबाबदारी संबंधित अधिकारी यांचे वर राहील अशी जखमेतील खदखद येथे व्यक्त होत आहे.जखमा जुन्या असल्या तरी समस्त जनतेच्या भावनांशी निगडीत आहेत हेच का कळू नये येथील ग्रामसेवक संभाजी देवरे आणि सरपंच शिवाजी वामन बागुल यांना.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून या संतापाचा उद्रेक केव्हा होईल याचा भरोसा मात्र नाही असे ही तरुणान मध्ये चर्चिले जात आहे.गेल्या सात आठ वर्षापासून माळवाडी गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी जवळच क्रांतिकारी महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या साठी किंवा त्यांची तस्वीर लावण्या साठी चौथरा बांधण्यात आला असला तरी त्यास ग्रामपंचायती कडून तारेच्या जाळीचे कंपाऊंड उभारले जात नाही अनेक वर्षा पासून ची समस्त तरुणांची. ही जुनी मागणी असून ग्रामपंचायतीच्या कारभार चालविणाऱ्यानी याकडे मात्र आपल्या सोयी नुसार दुर्लक्ष केले आहे.माळवाडी गावी सुमारे दीड ते दोन हजार माळी समाज असून ” माळी” समाजाच्या आत्मीयतेचा प्रश्न सोडविला जात नाही मात्र त्यास कायम हरताळ फासले जात आहे.गावाच्या नावातच ” माळ ” अडकली असलीतरी माळी समाजाचे दैवत सुद्धा ” माळी ” च होते असल्या दैवताचे ” माळवाडी ” गावी पुतळा तर पाहिजे होताच करणार काय? पुतळा नाही हे माळवाडी आणि फुले माळवाडी गावकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. परंतु सध्या तरुणांनी पुढाकार घेतला असून आत्मियेतचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.याबाबत माजी सरपंच सुरेश तुळशीराम बागुल,साहेबराव बागुल,बापू ओंकार बागुल, दादाजी तानाजी शेवाळे, जयराम सोनवणे, नीकेश ( रींकु) अभीमन जाधव,जयवंत पोपट गोसावी, तात्या  भदाणे , नितीन (फन्टर )शेवाळे,संजय( वंट्या )बागुल ,हेमंत बागुल,उत्तम बागुल, निंबा खैरनार, गंगाधर शेवाळे यासह अनेक तरुणांनी येत्या १५ ओगस्टच्या आत चौथर्यास तारेच्या जाळीचे कंपाऊंड ग्रामपंचायतीने उभारावे अशी मागणी ग्रामसेवक देवरे यांचे कडे केली असून आमचा आत्मियेतेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे.अशातच गेल्या ५ते ६ महीन्यापासून ग्रामसेवक संभाजी देवरे आणि सरपंच शिवाजी वामन बागुल यांच्या बालहट्टा मुळे गावातील माळी समाजातील भावना भडकावून गावात दंगल घडविण्याच्या उद्देशाने की काय ? पोलीस निरीक्षक देवळा यांचे नावे गोसावी  समाधी स्थळांची काही समाज कंटकाकडून विटंबना सुरू आहे.त्या बाबत तातडीने कारवाई करावी असे ग्रामपंचायतीच्या लेटर हेड वरती खोटे टाईप करून सदर लेटर हेड वरती ग्रामसेवक संभाजी देवरे,सरपंच शिवाजी बागुल  व अन्य सदस्य यांनी सह्या करून मिथुन उर्फ यशवंत सुरेश गोसावी यांचे कडे दिले.आणि त्याने पुन्हा अन्य नागरिकांच्या सह्या करून देवळा पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांचे कडे दिले.जर विटंबना सारखी घटना आज पर्यंत गावात किंवा मळ्यात घडलीच नाही तर देवरे ग्रामसेवक व शिवाजी बागुल सरपंच यांनी अशी खेळी करून गावात माळी आणि गोसावी समाजात भांडण लाऊन दंगल घडविण्याचा प्रकारास चिथावणी देण्याचा त्यांचा हेतू काय ? हे नेमके भाळले कशाला ? पैशाला की अजून काही कोणते अमिषाला ? हे नेमके समजू शकले नाही परंतु गावात प्रथम नागरिक म्हणून आणि गावातील सरकारी अधिकारी म्हणून यांनी असे खोटे लिखाण करून भावना भडकवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे हे  यांच्या पदास ” लाज ” वाटेल असा प्रकार करणे म्हणजे बालिश बुद्धी म्हणावी की काय ? यामुळे माळी समाजातील भावना खदखदत असून जिल्हाधिकारी ,नाशिक, जिल्हा पोलीस प्रमुख पाटील,नाशिक ,लीना बनसोड मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद नाशिक,  प्रांत अधिकारी  देशमुख ,चांदवड,तहसीलदार विजय सुर्यवंशी ,देवळा ,गटविकास अधिकारी देशमुख देवळा पंचायत समिती यांनी याबाबत जातीने लक्ष घालून माळी समाजास न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली असून याबाबत जिल्हा दंडाधिकारी नाशिक यांनी जिल्हा पोलिस प्रमुख यांना आपले स्तरावरून उचित कार्यवाही करण्याचा आदेश दिला असून त्यांनी देवळा पोलीस निरीक्षक लांडगे यांना चौकशीचे आदेश दिले असेल तरी या आदेशास एक महिन्याचा कालावधी उलटला तरी चौकशी गुलदस्त्यात ठेवल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे माळी समाजातील हि जखम आजवर ठसठसते आहे.तर गटविकास अधिकारी देशमुख यांना नाशिक जिल्हा परिषदेतील बाविस्कर यांचे कडून तसेच देवळा तहसीलदार सूर्यवंशी यांनी सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र गटविकास अधिकारी कोणास बळी पडत आहेत ? कार्यवाही करून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात कचुराई करत असल्याचे बोलले जात आहे.असे असले तरी कर्तव्य दक्ष प्रांत अधिकारी यांनी याकामी लक्ष घातल्याचे समजले असून त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण माळवाडी आणि फुले माळवाडी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. बुध्दी भ्रष्ट काम करणारे अधिकारी ग्रामसेवक यांना खोटं बालंट करण्याची गरज काय ? किमान आपण शासकीय कर्मचारी आहोत याचे भान त्यांना का असू नये ? तर सरपंच माळी समाजातील असून सुद्धा माळी समाज विरुद्ध खोटे लिखाण करून सही करणे आणि त्यांचे मागे काही ग्रामपंचायत सदस्यांनी आणि तरुणांनी सह्या करून समाजात दंगल भडकवणे असा प्रकार का करावा ? नेमका हा सरपंच भाळला कशाला ? या बाबतीत गावात जोरदार चर्चा असून उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी त्वरित असल्या बेजबाबदार असणाऱ्या ग्रामसेवक,सरपंच व सह्या करणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल करून माळी समाजास न्याय द्यावा अशी मागणी कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज द्वारे तसेच अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा ग्रामस्थांच्या ठसठस करणाऱ्या ह्या जखमा फुटणार त्याची जबाबदारी संबंधित अधिकारी यांचे वर असणार असा इशाराही तरुणांनी दिला असून येत्या १५ ऑगस्ट आधी हा न्याय द्यावा अशी ही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here