
औरंगाबाद : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज: नेटवर्क _ राज्यपालांचा विद्यापीठा तर्फे निषेध व्यक्त करणे ही देशातील पहिलीच घटना घडली असून हा इतिहासच म्हणावा लागेल अशी घटना औरंगाबाद येथे घडली . औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सर्व सदस्यांनी हा निषेध व्यक्त केला.भारत देशाचे आराध्य दैवत शिवाजी राजेश्री छ्त्रपती शिवाजी महाराज व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्री आई यांच्या बाबत अवमानकारक बालिश वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सर्व अधिसभा सदस्यांनी एक मताने निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला.विशेष म्हणजे विद्यापीठाच्या वार्षिक सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला.विद्यापीठाचे कुलगुरू हे राज्यपाल असतात आणि राज्यपालांचा विद्यापीठा तर्फे निषेध व्यक्त करणे म्हणजे ही देशातील पहिलीच घटना घडली असून हा इतिहासच म्हणावा लागेल. औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणजे अन्याया विरुध्द लढा उभारणे अशी ह्या विद्यापीठाची ख्याती आहे.
