राज्याच्या अर्थसंकल्पात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदरी घोर निराशा , १५ मार्च रोजी आझाद मैदानावर धडकणार” संताप” मोर्चा
1 min read

मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क : महाराष्ट्र सरकारने चालू वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर केला असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आश्वासने देऊनही बजेट मध्ये कर्मचाऱ्यांच्या पदरी घोर निराशा दिल्याने राज्यभरातील संपूर्ण अंगणवाडी कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.शासनाने बजेट जाहीर करताच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला त्यामुळे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लागलीच ऑनलाईन बैठक घेऊन १५ मार्च २०२२ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर संताप मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या विविध मागण्या साठी आंदोलने छेडावी लागली फक्त आश्वासनाची ” खीर ” दान करण्याचा प्रकार ह्या शासनाने चालवल्याने कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.मागण्या : मानधनात वाढ,मासिक पेन्शन, दैनंदिनी माहिती भरण्यासाठी नवीन मोबाईल मराठी मधील चांगले ॲप ,लाभार्थ्यांना चांगला पूरक पोषण आहार,अंगणवाडीच्या भाड्यात वाढ,किरकोळ खर्च साठी रकमेत वाढ ,रिक्त पदासाठी भरती,पदोन्नती आधी मागण्यांसाठी सर्वच जिल्ह्यांमध्ये अनेकदा आंदोलने केली तर २३ फेब्रुवारी ०२२ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर तीन दिवसांसाठी धरणे आंदोलन केले परंतु महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती कुंदन यांनी शिष्टमंडळाला भेट दिली आणि अनेक आश्वासनाची ” खैरात ” कबूल केली.सचिव अर्थात बालविकास विभागाचा ” कणा ” च आपल्याला आश्वासन देतोय असे म्हणून ” भाबड्या ” आंदोलक शिष्टमंडळाने “विश्वास ” ठेऊन तीन दिवसाचे आंदोलन कुंदन यांनी सांगितलेल्या आश्र्वासना मुळे पहिल्याच दिवशी मागे घेतले.आणि तिथेच ” कुंदन ” यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे केले ” खंडन ” कारण जेव्हा राज्य सरकारने बजेट जाहीर केले त्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ” न्याय ” मिळेल अशी ” आस” ( अपेक्षा) होती.परंतु बजेट पाहून वा ऐकून सर्व कर्मचारी वर्गाचा भ्रमनिरास झाला .आणि संतापाचा उद्रेक होऊ लागला.बजेट मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल देण्याची घोषणा च फक्त शासनाने पाळली.त्या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या पदरी काहीच पडले नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.तर कृती समितीच्या बाहेरच्या काही अपरिपक्व संघटनांनी खातरजमा न करता श्रेय घेण्याचा केवीलवाना प्रयत्न केला .या सर्व पारश्वभूमीवर कृती समितीने लागलीच ऑनलाईन बैठक घेऊन १५ मार्च ०२२ रोजी आझाद मैदानावर” संताप” मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.
