मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क _ नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नाशिकचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून गंगाधरन देवराजन ( डी गंगाधरन ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची बदली करण्यात आली असून त्यांची बदली नेमकी कुठे करण्यात आली हे रात्री उशीरा पर्यंत समजू शकले नाही.मात्र मांढरे यांनी कोरोना काळात उत्तम कामगिरी केल्याने नाशिक सह जिल्ह्यातील नागरिकात त्यांचे कामगिरी विषयी गर्व आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉ.संजय चहांदे , ए.एम.लिमये, एस. ए. तागडे,श्रीमती आभा शुक्ला,डॉ.अमित सैनी, आर. एस.जगताप,विवेक भीमानवार ,राहुल द्विवेदी आणि गंगाधरन देवराजन आदी आय. ए. एस.अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनाने केल्या आहेत.डी गंगाधरन यांची नाशिक जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली असून गंगाधरन हे यापूर्वी वसई विरारचे आयुक्त म्हणून कार्यरत होते ऑक्टोबर २०२१ मध्ये डी.गंगाधरन वसई विरार महापालिकेचे आयुक्त असताना त्यांची नाशिकला बदली झाल्याची जोरदार चर्चा मुंबईसह परिसरात रंगली होती.परंतु त्यांची मंत्रालयातील मुख्य सचिव कार्यालयात उपसचिव पदी बदली करण्यात आली होती.ते २०१३च्या बॅचचे आय. ए. एस.अधिकारी आहेत. उत्कृष्ट कर्तव्यदक्ष अधिकारी असून कामात काम चुकार पण करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलेच व्यसन घालतात अशी त्यांची ख्याती असून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचे अधिक प्राधान्य असते.
