…. तर विधानसभेत फाशी घेणार ,आ.रवी राणा भडकले
1 min read

मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क _ काही दिवसांपूर्वी आ.रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांत आणि अमरावती महापालिका आयुक्त यांच्यात वाद विवाद झाल्याने आयुक्तांवर राणा यांच्या कार्यकर्त्यांनी शाही फेक केल्याने आ.रवी राणा यांच्यावर ३०७ आणि ३५३ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचे विधानसभेत पडसाद उमटले. माझा काही कसूर नसतांना माझेवर गुन्हा दाखल केला असे आ.रवी राणा यांनी विधानसभेत मत व्यक्त करतांना सांगितले त्यावेळी ते अधिकच भडकले .आ.राणा यांनी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर आरोप केले मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी फोन केल्यानेच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी खोटं बोलत नाही जर मी खोटं बोलत असेल असे तुम्हास वाटत असेल तर माझेकडे पेन ड्राईव्ह मध्ये पुरावे आहेत.मी घटना स्थळी नसतांना माझ्यावर गुन्हा दाखल करत असाल तर मी विधानसभेत फाशी घेणार असा संताप जनक इशारा आमदार रवी राणा यांनी विधानसभेत दिला तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री किंवा कुणीही फोन केलेला नाही असे स्पष्ट करत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
