आनंदशेठ यादव यांचा माणगाव तालुका पत्रकार संघटनेतर्फे जोरदार सत्कार
1 min read

माणगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नरेश पाटील :

माणगांव येथील नामांकित उद्योजक,माजी नगराध्यक्ष तथा गोडव्यक्तिमत्व असलेल्या आनंदशेठ यादव यांचे ‘माणगांव ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित.’उत्तेखोल ता. माणगांव च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल माणगांव तालूका पत्रकार संघटने कडून आनंदशेठ यादव यांचा शाल व पुस्पगुच्छ देऊन आत्मीय सत्कार शनिवार दि.05 मार्च रोजी करण्यात आला. या समयी सदर पत्रकार संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सलीम शेख व ईतर पदाधीकाऱ्यानी आनंदशेठ यादव यांची सदिच्छा भेट घेऊन सन्मान केला.
यावेळी माणगांव ता.पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सलीम शेख यांनी मनोगत व्यक्त केले. आनंद यादव यांची सदर पत संस्थेचे अध्यक्ष पद हे पाच्वयंदा भूषवीत असल्याचे सांगितले. अनेक खातेदारानी या पतसंस्थेत खाते उगडले आहे ते निवळ आनंद यादव यांच्या मुळेच असल्याचेही पुष्ठी जोडली.पुढे बोलताना निदर्शनास आणून दिले कि या पत संस्थे मुळे अनेक जणांना रोजगारही मिळाला आहे, अनेकांना आपल्या व्यवसाया करण्याकारिता कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. या पतसंस्थे ची वाटचाल सुवर्णा महोत्सवाकडे यशस्वी पाऊल टाकत असल्याचे शेख यांनी सांगितले. त्यानंतर सचिन देसाई यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.