September 21, 2023

राष्ट्र सेवा दलाचे पूरग्रस्तांसाठी मदतीचे नम्र आवाहन

1 min read

परखड  ,दमदार,निर्णायक महाराष्ट्रातील जनतेचे हक्काचे, प्रत्येक घरा _ घरात व घरातील प्रत्येकाच्या ” मन पसंतीस उतरलेले ” प्रगतीचे “एक ” निर्भिड ” “फास्ट ” “महाराष्ट्र न्यूज ”  वेब पोर्टल / वेब चॅनल साठी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क करा .तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा … संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक ,महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131 .

क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मालेगाव _ सध्या महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात धो धो पाऊस सुरू असल्यामुळे

 

 

 

धो धो पाऊस आणि कोसळणार्‍या दरडींमुळे महाराष्ट्रात गेल्या 3-4 दिवसांपासून मृत्युचे तांडव पाहावयास मिळत आहे. आता कुठे पावसाने काहीशी उसंत दिली आहे. चिखलमातीच्या ढिगार्‍याखाली अनेक जिती-जागती माणसे गाडली गेल्यामुळे नातलगांच्या आर्त किंकाळ्या काळीज चिरत आहेत. अजूनही काही बेपत्ता आहेत, त्यांच्या नातेवाईकांच्या काळजाचा ठोका ही चुकवत आहेत.

थोडक्यात पावसाचा आणि पूरस्थितीचा मोठा फटका महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगरांना बसला आहे. या 10 जिल्ह्यातील साधारणपणे 900 गावे या जलतडाख्याने उध्वस्त झाली आहेत. यापैकी बहुतेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्र सेवा दलाच्या मदतकार्याच्या तुकड्या रवाना झाल्या असून पुनर्वसन आणि मदतीसाठी कार्यकर्त्यांनी काम सुरू केलेले आहे.

या पत्रकाद्वारे आम्ही आपणास नम्र आवाहन करतो की, या पूरग्रस्तांना वस्तू तसेच रोख स्वरुपात मदत पोहचविणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी अन्नधान्य, ब्लॅंकेट, ताडपत्री, सतरंजी, वह्या-पुस्तके, स्वेटर्स, बॅग्स सोबतच चिखलातून चालण्यास गम बूट, रोख रक्कम  जे शक्य होईल ते जमा करावे.

या मदत कार्याची व्याप्ती खूप मोठी असणार आहे. आपण शक्य ते अधिक आर्थिक सहकार्य या मानवतावादी कार्याला करावे, असे आवाहन नासिक जिल्ह्यातील मालेगाव जिल्हा कार्याध्यक्ष विलास वडगे, तालुका कार्याध्यक्ष सुधीर साळुंके यांनी केले आहे.

 

*मदतीसाठी संपर्क*:-

 

विलास वडगे- 94228 37507

 

रविराज सोनार- 9420233233

 

सारंग पाठक- 9860130447

 

राजेंद्र दिघे- 94216 00711

 

नचिकेत कोळपकर- 9921140729

 

राजीव वडगे- 98224 93259

 

स्वाती वाणी- 9370633060

 

आपली मदत वरील सेवा दल पदाधिका-यांकडे  जमा करण्याची विनंती करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.