
परखड व निर्भिड पने आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहचिण्यासाठी संपर्क करा ,भारत पवार , मुख्य संपादक, महाराष्ट्र न्यूज : 9158417131
महाराष्ट्र न्यूज ,जगदीश का.काशीकर ,मुंबई _
कोणत्याही बिल्डर ने एका महिन्याचे जरी भाडे थकविले तरी पुनर्विकासाचा करार रद्द होणार असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला.
बिल्डरने भाडे थकवणे, हा एकप्रकारचा सामाजिक अन्याय आहे असे मतही न्यायालयाने नोंदविले आहे.
बिल्डिंग पुनर्विकासाला जात असताना सदनिका धारकांशी गोड, गोड बोलून ईमारत खाली केली जाते, त्यानंतर ती पाडली जाते, व एक वर्षेभर भाडे दिल्यानंतर इमारतीचे कामही जागेवर थांबते व बिल्डर भाडे ही देणं बंद करतो.
असे हजारो प्रकल्प आणि लाखो लोकं मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये आहेत, ज्यांचे घरही गेलं आहे आणि बिल्डरने भाडे ही देणं बंद केलं आहे.
केवळ राजकीय वरदहस्त टक्केवारी मुळे असे प्रकल्प जाणीवपूर्वक अडकवून ठेवले जात आहेत.
आताही सरकारने बिल्डरने ऍडव्हान्स मध्ये तीन वर्षांचे भाडे द्यावे, हा जीआर रद्द करून केवळ एक वर्षाचे भाडे ऍडव्हान्स द्यावे असा नवीन जीआर लागू केला आहे.
मित्रांनो जागे व्हा, सतर्क रहा, जागरूक रहा !!
बऱ्याचदा कमिटी सभासदांना तोंडी सांगत असते बिल्डर हे देणार आहे, बिल्डर ते देणार आहे पण त्यांच्या ह्या सगळ्या थापा ही असतात, ते सगळं करारात आहे का हे तपासा.
