
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्या साठी संपर्क करा . भारत पवार , मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131.
वासूळ _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रशांत गिरासे _
किसान युवा क्रांती संघटनेची देवळा तालुक्याची कार्यकारणी आज घोषित करण्यात आली ,संपूर्ण राज्यभरात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काम करत असणाऱ्या किसान क्रांती संघटनेच्या देवळा तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची निवडीचा कार्यक्रम आज घेण्यात आला. त्याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे तालुकाध्यक्ष निकेश (रिंकू) जाधव यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून माळवाडी गावचे सरपंच शिवाजी बागुल,संभाजी देवरे ,आदर्श शेतकरी अभिमान हरी बागुल हे उपस्थित होते त्यावेळी देवळा तालुक्यातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी मार्गदर्शन केले
नवनियुक्त पदाधिकारी म्हणून विशाल बागुल तालुका उपाध्यक्ष, मयूर मोरे तालुका उपाध्यक्ष, पंकज केदा बोरसे तालुका उपाध्यक्ष, मनोहर विश्वास शिवले तालुका संघटक, राहुल धनाजी आहेर तालुका सचिव, चंद्रकांत रामदास पवार तालुका उपसंघटक, निलेश रामराव निकम तालुका कार्याध्यक्ष, योगेश नामदेव निकम खजिनदार,योगेश्वर खैरनार सोशल मीडियाप्रमुख,विवेक सोनवणे सोशल मीडियाउपाध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, त्यावेळी मोठ्या संख्येने तरुण शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण गांगुर्डे यांनी केले.
