नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ राजू केदारे _ यांज कडून _ वाशी येथील पाम बीच गॅलरीयामधील क्लब नशा या पबला महापालिकेकडून सील करण्यात आले आहे. कोरोना काळात सातत्याने नियमांचे उल्लंघन केल्याने या पबवर ही कारवाई करण्यात आली. नवी मुंबई पोलिसांकडून शहरात नशामुक्त नवी मुंबई ही मोहीम हाती घेतली आहे. यात अमलीपदार्थ विक्रीबरोबर शहरातील पब, बारमध्ये कारवाई करण्यात येत आहे. ६ मार्च रोजी नशा बारमध्ये सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत दोनशेपेक्षा अधिक युवकांना ताब्यात घेण्यात आले होते.यात अनेकजण अल्पवयीन होते. यात करोना नियमांचे उल्लंघनही होत होते. सीबीडी येथील धमाका ‘पब’मध्येही असाच प्रकार सुरू होता. मात्र तांत्रिकदृष्टय़ा पोलिसांना कारवाई करता येत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी याबाबत लेखी पालिका प्रशासनाला कळविले होते. ही बाब गंभीर असल्याने पालिका प्रशासनाने हे दोन्ही पबला टाळे ठोकले आहेत.