
मालेगाव- हुतात्मा दिनानिमित्ताने सायंकाळी 5.48 वा. महात्मा गांधी पुतळा मोसमपूल येथे राष्ट्र सेवा दल, आणि समविचारी संस्था संघटना महित्मा गांधी यांचेसह भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्र सेवा दल जिल्हा कार्याध्यक्ष विलास वडगे व राज्यमंडळ सदस्य स्वाती वाणी यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महात्मा गांधी यांचे वर 30 जानेवारी 1948 सायंकाळी 5.48 वा. एका अत्यन्त चलाख माणसाने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. म्हणून आज आम्ही सर्व जण इथे सर्व धर्म प्रार्थना म्हणून महात्मा गांधी आणि भारतीय स्वातंत्र्य लढयातील सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. तसेच
याच ठिकाणी आपण शेतकरी आंदोलनातील शहीद साथींना ही श्रद्धांजली अर्पण करणार आहोत, अशी राष्ट्र सेवा दल राज्य सचिव नचिकेत कोळपकर यांनी मांडणी केली.
त्यांनतर सर्वानी सर्व धर्म प्रार्थना व खरा तो एकची धर्म ही प्रार्थना म्हटली. 2 मिनिट मौन पाळून सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.शेतकरी आंदोलनातील शाहिदाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बापू तेरे सपनो को मंजिल तक पहूचायेगे*
या घोषणेने परिसर दुमदुमला.
या प्रसंगी राष्ट्र सेवा दल जिल्हा संघटक रविराज सोनार, तालुका संघटक सारंग पाठक, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते दिनेश ठाकरे तसेच साथी राजेंद्र भोसले, काकाणी नगर वाचनालयाचे अध्यक्ष अजय शाह, सुनील वडगे, राजीव वडगे, जेष्ठ सर्वोदयी संजय जोशी, प्रा. के. एन. अहिरे, निखिल पवार, साथी अनिल महाजन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्याध्यक्ष संदीप खैरनार, मुजम्मिल डिग्निटी, युसुफ अब्दुल्ला, अवंती वाणी यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
